Advertisement

हार्बर, 'मरे'चा मेगाब्लॉक, तर परेचा नाईटब्लॉक


हार्बर, 'मरे'चा मेगाब्लॉक, तर परेचा नाईटब्लॉक
SHARES

मध्य, हार्बर मार्गावर रविवारी 27 आॅगस्ट रोजी मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रीच ब्लॉक घेण्यात येईल.


मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर सकाळी 11.15 ते संध्याकाळी 4.15 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येतील. ब्लॉक दरम्यान कल्याण ते ठाणे मार्गावरील अप जलद मार्गावरील वाहतूक अप धिम्या मार्गावरून चालवण्यात येईल. परिणामी या लोकल गाड्या 20 मिनिटे उशिराने धावतील. याच दरम्यान डाऊन जलद मार्गावरील लोकल गाड्यांना सकाळी 10.08 ते दुपारी 2.42 या वेळेत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे या गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने धावतील.

ब्लॉकदरम्यान अप मार्गावरील 50104 रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन दिवा स्थानकांपर्यतच चालवण्यात येईल. त्यानंतर ही गाडी तेथूनच रत्नागिरीला रवाना होईल. मुंबईत येणाऱ्या सर्व मेल-एक्स्प्रेस गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 20 ते 30 मिनिटे उशिराने दाखल होतील.


हार्बर रेल्वे

हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 वाजेपर्यंत अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येतील. ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांची वाहतूक सकाळी 10.20 ते दुपारी 3.48 वाजेपर्यंत कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान बंद असेल. यादरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल स्थानकांदरम्यान स्पेशल ट्रेन चालवली जाईल. हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत ट्रान्स हार्बर आणि मेन लाईनने प्रवास करू शकतात.


पश्चिम रेल्वेचा नाईटब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी (26 आॅगस्ट) रात्री वसई रोड ते भाईंदर दरम्यान नाईट ब्लॉक असणार आहे. शनिवारी रात्री 12.30 ते पहाटे 4 या वेळेत अप आणि डाऊन जलद मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येतील.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा