Advertisement

तिन्ही रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक

देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप व डाउन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

तिन्ही रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक
SHARES

देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप व डाउन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाउन हार्बर मार्गावरही ब्लॉक घेतला जाणार असून पायाभूत सुविधा व देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी १८ एप्रिल रोजी मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी ११:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. माटुंगा ते मुलुंड धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून सुटणाऱ्या धिम्या मार्गावरील गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील.

ठाणे येथून सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील गाड्या मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. अप आणि डाउन मार्गावरील गाड्या विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकांवर थांबणार नाहीत.

हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी १८ एप्रिल रोजी सकाळी ११:१० ते संध्याकाळी ४:१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून वाशी, बेलापूर, पनवेलकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल गाड्या रद्द राहातील. तसेच ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून वांद्रे, गोरेगावकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावरील सेवा बंद राहातील. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला स्थानकादरम्यान विशेष लोकल गाड्या चालवण्यात येतील.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी १८ एप्रिल रोजी मेगाब्लॉक असून, सकाळी १०:०० ते दुपरी ४:०० वाजेपर्यंत असणार आहे. माहीम ते अंधेरी हार्बर लाईन अप आणि डाउन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉकदरम्यान चर्चगेट ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गावरील काही लोकल गाड्या रद्द केल्या आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा