मेट्रो-1 चे वेळापत्रक आता 'गुगल मॅप'वर

 Mumbai
मेट्रो-1 चे वेळापत्रक आता 'गुगल मॅप'वर
Mumbai  -  

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो प्रवाशांसाठी आता एक खुशखबर आहे. किती वाजता कोणत्या मेट्रो स्थानकावर मेट्रो येणार हे आता प्रवाशांना 'गुगल मॅप'वर समजणार आहे. कारण मेट्रोच्या वेळापत्रकासह मेट्रोच्या इतर सेवांची माहिती आता 'गुगल मॅप'वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई मेट्रो-1 प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) ने गुगलशी हातमिळवणी करत 'गुगल मॅप' अॅप्लिकेशनमध्ये मेट्रो-1 च्या सेवेची सर्व माहिती उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे मेट्रो-1 चा प्रवास आणखी सुकर होणार असल्याचा दावा एमएमओपीएलकडून करण्यात येत आहे.

या अॅप्सच्या माध्यमातून मेट्रो-1 च्या प्रत्येक मेट्रो फेरीची माहिती, वेळापत्रक, मेट्रो आताच्या क्षणी कोणत्या स्थानकावर वा कुठे आहे हे देखील समजणार असून, मेट्रो कोणत्या स्थानकाला किती वाजता पोहोचणार याचीही माहिती प्रवाशांना मिळणार आहे. 'गुगल मॅप' अॅपवर आपले इच्छित मेट्रो स्थानकाचे नाव टाईप केल्यानंतर मेट्रो सर्व्हिसेस या ऑप्शनवर क्लिक केले की, मेट्रोचे वेळापत्रक उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना इच्छित मेट्रोने प्रवास करणे आता सोपे होणार आहे. मेट्रोच्या वेळापत्रकाबरोबरच मेट्रोसंदर्भातील इतर माहितीही या अॅपवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Loading Comments