Advertisement

'मेट्रो २ अ', 'मेट्रो ७' मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार

‘मेट्रो २ अ’चा डहाणूकरवाडी ते आनंदनगर आणि ‘मेट्रो ७’चा दहिसर ते आरे असा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

'मेट्रो २ अ', 'मेट्रो ७' मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार
SHARES

‘मेट्रो २ अ’चा डहाणूकरवाडी ते आनंदनगर आणि ‘मेट्रो ७’चा दहिसर ते आरे असा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे. सध्या या मार्गावर सुरक्षा चाचणी सुरू आहे. तसंच, या मेट्रोचे सारथ्य करण्यासाठी २१ महिला मेट्रोचालक (मेट्रो ट्रेन पायलट) सज्ज झाल्या आहेत.

बहुप्रतीक्षित ‘मेट्रो २ अ’ (दहिसर ते डीएन नगर) आणि ‘मेट्रो ७’ (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) मार्गिकेतील पहिल्या टप्प्याची सुरक्षा चाचणी सुरू झाली आहे. त्यामुळे आता लवकरच दोन्ही मार्गिकेतील पहिला टप्पा सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोशनच्या (एमएमएमओसीएल) माध्यमातून पहिला टप्पा सुरू करण्यासाठीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. तसंच प्रशिक्षण पूर्ण करून कर्मचारीवृंद सज्ज ठेवला आहे.

एमएमएमओसीएलने मेट्रोचालकांची नियुक्ती करताना महिलांना प्राधान्य दिले आहे. एकूण ९७ मेट्रो चालकांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या ९७ मेट्रो चालकांमध्ये २१ महिला मेट्रोचालकांचा समावेश असल्याची माहिती मिळते. त्यामुळं या दोन्ही मेट्रो मार्गावरील मेट्रो गाड्यांचे सारथ्य करताना दिसणार आहेत.

इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकलमधील डिप्लोमा तसेच बीएससी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) अशी शैक्षणिक पात्रता यासाठी आवश्यक आहे. त्यानुसार ‘एमएमएमओसीएल’ने २१ महिला मेट्रोचालकांची निवड केली आहे.

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर ‘मेट्रो १’मध्ये दोन मेट्रोचालक  सेवा देत आहेत. आता भविष्यात मेट्रो मार्गिका खुल्या होत जातील तशी महिला चालकांची संख्याही वाढत जाईल.

एमएमआरडीए मेट्रो प्रकल्पासाठी बंगळुरू येथील एका कंपनीकडून देशी बनावटीच्या मेट्रो गाड्यांची बांधणी करून घेत आहे. यातीलच १० गाड्या पहिल्या टप्प्यासाठी सज्ज झाल्या आहेत. या गाड्यांचे वैशिष्ट्यं म्हणजे या चालकविरहित अशा स्वयंचलित गाड्या आहेत. पण सुरुवातीला मात्र मेट्रो चालकाद्वारेच मेट्रो गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र त्यानंतर स्वयंचलित पद्धतीने गाड्या चालवल्या जाणार आहेत. मात्र असं असलं तरी गाडीत मेट्रोचालक आहेत. तर गाडी कारशेडमध्ये उभी करणे, दुरुस्तीसाठी नेणे यासाठी मेट्रोचालकांची आवश्यकता भासेल अशी माहिती मिळते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा