मुंबईत पाच वर्षांचा ‘मेट्रोब्लॉक’

  Pali Hill
  मुंबईत पाच वर्षांचा ‘मेट्रोब्लॉक’
  मुंबई  -  

  मुंबई - दहिसर ते डीएननगर मेट्रो-2 ब आणि दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पूर्व) मेट्रो-7 या दोन मेट्रो मार्गाचे काम आता लवकरच एमएमआरडीओकडून सुरू होणार आहे. या मेट्रोच्या कामासाठी बॅरीगेट्स बसवण्यात येणार आहेत. तसेच काही ठिकाणी रस्तेही बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर येत्या काळात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होणार आहे. मेट्रोचे काम पुढील चार ते पाच वर्षे सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुढचे किमान पाच वर्षे पश्चिम द्रुतगती मार्गावरील मेट्रोब्लॉकचा सामना करावा लागणार आहे.

  "पश्चिम द्रुतगती मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीसाठी वाहतूक पोलिसांसह एमएमआरडीए सज्ज आहे. यासाठी 5000 ठिकाणी बॅरीगेट्स बसवण्यात येणार आहेत. 500 ट्रॅफिकही वॉर्डन्स कार्यरत असणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त प्रविण दराडे यांनी केला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.