Advertisement

कोरोनाला आळा घालण्यासाठी मेट्रोच्या फेऱ्यांत वाढ

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेनं कंबर कसली आहे.

कोरोनाला आळा घालण्यासाठी मेट्रोच्या फेऱ्यांत वाढ
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेनं कंबर कसली आहे. अशातच आता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि सुरक्षित अंतर राखण्यासाठी आता मेट्रोनं ही आपल्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. सोमवारपासून मेट्रोनं फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मार्गावर सोमवारी २२ मार्चपासून २८० फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.

कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर मेट्रोमधून दर आठवड्याला १ लाखांवर प्रवासी प्रवास करीत आहेत. कोरोनापूर्व काळात साडेचार लाखांच्या तुलनेत सध्या १.१ लाख प्रवासी मेट्रोतून प्रवास करत असून, सध्या २५६ मेट्रो फेऱ्या सुरू आहेत. वाढत्या प्रवासी संख्येमुळं सर्व मेट्रो स्थानकांत हेल्थ डेस्क उभारण्यात आलं आहेत.

इथं तापमान मोजण्याची सुविधा आणि प्रवाशांना सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात येत आहे. मेट्रो स्थानके आणि मेट्रोमध्ये उद्घोषणेतून प्रवासात मास्कचा वापर करणे बंधनकारक असल्याचा संदेश देण्यात येत असल्याचे मेट्रो वन प्रशासनाकडून सांगण्यात आले.



हेही वाचा -

शरद पवारांनी उल्लेख केलेले ज्युलिओ रिबेरो कोण आहेत? जाणून घ्या

तुम्हाला कर भरावा लागत नसेल तरी भरा आयटीआर, मिळतील 'हे' फायदे


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा