Advertisement

Metro Line 2A and 7: डहाणूकर वाडी ते आरे मार्गावरील मेट्रो 'या' दिवशी प्रवाशांसाठी बंद

जाणून घ्या या मागील कारण

Metro Line 2A and 7: डहाणूकर वाडी ते आरे मार्गावरील मेट्रो 'या' दिवशी प्रवाशांसाठी बंद
SHARES

मेट्रो मार्ग 2अ आणि 7 मधील डहाणूकरवाडी ते आरे दरम्यान पहिल्या टप्प्यात सुरू असलेली मेट्रो सेवा ८ जानेवारीला प्रवाशांसाठी उपलब्ध नसेल.

मेट्रो मार्ग 2अ आणि 7 पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी फेज 1 आणि 2 या दोन्ही मार्गिकांमध्ये एकात्मिक सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित करणं गरजेचं आहे. या प्रणालीची अंमलबजावणी आणि चाचणी करण्यासाठी सध्या कार्यान्वित असलेल्या पहिल्या टप्प्यांतील सेवा बंद करणे आवश्यक आहे.

त्या अनुषंगाने दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात डहाणूकरवाडी ते आरे दरम्यान पहिल्या टप्प्यात सुरू असलेली मेट्रो सेवा बंद असेल.


‘हे’ आहे कारण

पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टीम, पॅसेंजर इन्फॉर्मेशन डिस्प्ले सिस्टीम, सिग्नलिंग आणि टेलिकॉम सिस्टीमसह रोलिंग स्टॉक यांसारख्या सिस्टीमची एकात्मिक चाचणी करणे.

दुसऱ्या टप्प्यात चाचणी होत असलेल्या तसेच वापरण्यात येणाऱ्या अद्ययावत प्रणाली सोबत पहिल्या टप्पा संरेखित करणे.
प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी संपूर्ण प्रणालीची अखंडता आणि सुरक्षितता तपासणे.

“प्रकल्पाची संपूर्ण स्थापत्य तसेच प्रणालीची कामे पूर्ण झाली आहेत, लवकरच मेट्रो 2अ आणि 7 चा दुसरा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल, ही मार्गिका पादचारी पुलाद्वारे मेट्रो मार्ग 1 सोबत जोडली गेल्यामुळे रस्त्यावरील रहदारी कमी होईल” अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली.



हेही वाचा

मुंबई ‘मेट्रो ७’वरील 10 मेट्रो स्थानकांचा गौरव

मेट्रो 7, मेट्रो 2 A सेवा जानेवारीच्या अखेरीस होणार सुरू, मेट्रो बदलून करावा लागणार प्रवास

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा