Advertisement

लोकल सध्या आहे कुठे? मोबाईल अॅपवर कळणार


लोकल सध्या आहे कुठे? मोबाईल अॅपवर कळणार
SHARES

मुंबई - तुम्हाला प्रवास करायचा आहे त्या लोकलची पोजिशन काय आहे हे जर तुम्हाला थेट तुमच्या मोबाईलवर समजलं तर? लोकलचे निश्चित ठिकाण लवकरच तुमच्या मोबाईलवर मिळणार आहेत. यासाठी प्रवाशांना मोबाईलमध्ये नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टीम ( एनटीईएस ) हे अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे.

अनेक वेळा लोकल पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर येऊन खोळंबून राहवे लागते. कारण कधी लोकल उशीरा येते. पण ती का उशीरा आहे? रेल्वे प्रवाशांना कळत नाही. पण आता पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना त्यांची लोकल नेमकी कुठे आहे? ती त्यांच्या स्थानकात किती वेळेत येणार आहे? ही सर्व माहिती थेट मोबाइल फोनवर पाहता येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते डहाणू मार्गाच्या सर्व स्थानकांवरील प्रवाशांना मोबाइलवर लोकलची नेमकी वेळ कळत होती. पण रेल्वे कधी येणार यासाठी कोणतीही प्रणाली उपलब्ध नव्हती. मध्य रेल्वेच्या नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टीमच्या (एनटीईएस) वेबसाइटवर ट्रेनची स्थिती समजू शकते. ही सोय पश्चिम रेल्वेवरही आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आहे. लवकरच ती मोबाइल, एनटीईएसवर उपलब्ध करून देण्याची योजना आखली जाणार आहे. पश्चिम रेल्वेवर दररोज 1,322 फेऱ्या चालवल्या जात आहेत. त्यामुळे प्रत्येक मार्ग या यंत्रणेशी जोडण्यात येणार आहे.

“पश्चिम रेल्वेच्या या नवीन उपक्रमाचे आम्ही स्वागत करतो. कारण रेल्वेने प्रवास करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. कारण एखाद्या लोकलला उशीर झाल्यास स्टेशनवर वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. पण आता एनटीईएस या अॅपद्वारे रेल्वे संदर्भात माहिती बसल्या जागी मिळू शकणार आहे. त्यामुळे गाडीच्या वेळा जाणून घेणे सोपे होणार आहे," असे रेल्वे महिला प्रवासी श्रृती हेंद्रे यांनी सागितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा