Advertisement

मुंबईकरांसाठी तीन नवीन मेट्रो


मुंबईकरांसाठी तीन नवीन मेट्रो
SHARES

मुंबई - अत्याधुनिक सोयी सुविधा विकसित करण्यासाठी मेट्रोचे जाळे विणण्याचा निर्णय MMRDAने घेतला आहे. त्यानुसार डी. एन. नगर मंडाले मेट्रो-2 ब, वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली मेट्रो-4 आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो-7 हे प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मंगळवारी झालेल्या प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सल्लागारांची नेमणूक करण्यात आली. मेट्रो-2 आणि मेट्रो-4 च्या अंमलबजावणीसाठी डीएमआरसी अर्थात दिल्ली मेट्रो कार्पोरेशनची अंतरिम सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मेट्रो-2 ब आणि मेट्रो-7 साठी आएशा इंजिनिअरींग आर्किटेक्चुरा कंपनीची सर्वसाधारण सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सल्लागार कंपन्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आवश्यक जबाबदाऱ्या पार पाडणार आहेत.

दरम्यान बीकेसीतल्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी कलानगर जंक्शन इथं दोन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तर बीकेसी संकुल आणि सांताक्रुझ-चेंबुर जंक्शनवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दोन उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही प्रकल्पाच्या बांधकामाच्या निविदांवरही शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे आता लवकरच हे प्रकल्पही मार्गी लागणार आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा