Advertisement

वाहतूक नियमांचं उल्लंघन करताय? भरावा लागेल 'इतका' दंड

विविध वाहतूक गुन्ह्यांसाठी राज्यभरात आकारला जाणाऱ्या दंडात वाढ केली आहे. जाणून घ्या नव्या नियमानुसार किती दंड आकारला जाणार आहे.

वाहतूक नियमांचं उल्लंघन करताय? भरावा लागेल 'इतका' दंड
SHARES

गुरुवारी, २ डिसेंबर रोजी, महाराष्ट्र सरकारनं मोटार वाहन कायद्यात (MVA) सुधारणा केली आहे. त्यांनी विविध वाहतूक गुन्ह्यांसाठी राज्यभरात आकारला जाणाऱ्या दंडात वाढ केली आहे. वाहतुकसंदर्भातील दुरुस्ती कायदा बुधवार, १ डिसेंबरपासून लागू झाला आहे.

'इतका' आकारला जाणार दंड

  • केंद्राच्या या नव्या कायद्यानुसार वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास दुचाकीस्वारांना १००० रुपये दंड, तर ४ चाकी वाहन मालकांना २००० रुपये दंड आकारला जाणार आहे.
  • ३ वर्षांच्या आत दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरही गुन्हा घडल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी १०,००० रुपये दंड आकारण्यात येईल.
  • लायसन्स (अनुज्ञप्ती)नसताही वाहन चालविणाऱ्यांकडून ५००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
  • बेदरकारपणे आणि धोकादायकरित्या वाहन चालवल्यास दुचाकीस्वाराला १००० रुपये, तर चार चाकी चालकाला ३००० रुपये आणि अन्य वाहनांच्या चालकाला ४००० रुपये दंड आकारण्यात येईल.
  • यापूर्वी दंडाची ही रक्कम ५०० रुपये होती. ३ वर्षांत दुसऱ्यांदा गुन्हा घडल्यास १०,००० रुपये दंड होणार आहे.
  • अशाच प्रकारचा दंड मोबाईलवर बोलताना वाहन चालवल्यासही होणार आहे. दुचाकीस्वारांना १००० रुपये, चार चाकी वाहन चालकाला २००० रुपये आणि अन्य वाहन चालकाला ४००० रुपये दंड होणार आहे.
  • वाहनांना परावर्तक (रिफ्लेक्टर)नसणे, फॅन्सी नंबर प्लेट बसवणं या वाहतुक नियमांविरोधात यापूर्वी २०० रुपये असलेल्या दंडाच्या रकमेत वाढ करुन ती १०००  रुपये करण्यात आली आहे.

वाहतूक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, लोकांनी वाहतुकीचे नियम मोडू नयेत म्हणून दंड वाढवला जातो. ते सुरक्षितपणे वाहन चालवतील, ज्यामुळे वाहनचालक आणि पादचारी अशा दोघांसाठीची रस्ता सुरक्षित राहिलं.



हेही वाचा

मुंबई-अलिबाग जलवाहतूक ३ दिवस बंद; प्रवाशांना मोठा मनस्ताप

ट्रेनचे वेळापत्रक, लाईव्ह स्टेटस एका क्लिकवर, जाणून घ्या कसे?

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा