Advertisement

एसटी प्रवासभाडं सवलतीसाठी ‘स्मार्टकार्ड’ बंधनकारक करण्यास मुदतवाढ

नागपूर अधिवेशनादरम्यान विविध लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिकांनी परिवहनमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.

एसटी प्रवासभाडं सवलतीसाठी ‘स्मार्टकार्ड’ बंधनकारक करण्यास मुदतवाढ
SHARES

राज्य परिवहन महामंडळाच्यावतीनं (एसटी) विविध सामाजिक घटकांना एसटी प्रवासभाडं सवलतीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘स्मार्टकार्ड’ योजना बंधनकारक करण्यास १ एप्रिल २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महामंडळानं घेतला आहे. याबाबत नागपूर अधिवेशनादरम्यान विविध लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिकांनी परिवहनमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.

स्मार्टकार्ड योजना

राज्य परिवहन महामंडळाच्यावतीनं विविध घटकांसाठी १ जून २०१९ पासून स्मार्टकार्ड योजना सुरू करण्यात आली असून सद्यस्थितीत ३० लाख ९७ हजार ७२६ जणांची नोंद झाली आहे. या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिक, विविध पुरस्कारार्थी, विद्यार्थी तसेच व्याधीग्रस्त रुग्णांना ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत स्मार्टकार्ड मिळविणं आवश्यक होतं. नोंदणीला मिळालेला प्रतिसाद पाहता ही मुदत वाढून देण्याची मागणी लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिकांनी केली होती. त्याला परिवहन मंत्री सुभाष देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मुदत वाढ

ज्येष्ठ नागरिक, विविध पुरस्कारार्थी, अधिस्विकृतीधारक पत्रकार तसंच व्याधीग्रस्त रुग्णांना स्मार्टकार्ड ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत प्राप्त करणं आवश्यक होतं. परंतु, आता ही मुदत ३१ मार्च २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसंच, १ एप्रिल २०२० पासून स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात येत आहे.

स्मार्टकार्ड बंधनकारक

मासिक, त्रैमासिक पासधारकांना स्मार्टकार्ड १५ फेब्रुवारी २०२० पासून बंधनकारक करण्यात येत आहे. तसंच, विद्यार्थ्यांसाठी १ जुन २०२० पासून स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात येत आहे. दिव्यांगांसाठी अद्याप स्मार्टकार्ड योजना लागु करण्यात आली नाही. त्यामुळं दिव्यांगांसाठी सद्याचीच कार्यपद्धती लागु राहणार आहे. या निर्णयामुळं ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.



हेही वाचा -

विविध विषयांवर सेना नगरसेवकांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक

... म्हणून एअर इंडियाच्या वैमानिकांनी दिली नोकरी सोडण्याची धमकी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा