Advertisement

विविध विषयांवर सेना नगरसेवकांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक

मुंबईतील विविध प्रभागांत राज्य सरकारशी निगडीत असलेली, मात्र परवानग्यांवाचून रखडलेली कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना नगरसेवकांसोबत बैठक झाली.

विविध विषयांवर सेना नगरसेवकांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक
SHARES

मुंबईतील विविध प्रभागांत राज्य सरकारशी निगडीत असलेली, मात्र परवानग्यांवाचून रखडलेली कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना नगरसेवकांसोबत बैठक झाली. महापालिकेतील विविध प्रकल्पांना राज्य सरकारकडून तातडीनं मंजुरी मिळून त्यांना गती मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात शिवसेनेच्या मुंबईतील नगरसेवकांची बैठक बोलावली होती.

भाजपशी सामना

येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपशी सामना करावा लागणार असल्यानं आतापासूनच तयारी करण्याच्या दृष्टीनं या बैठकीत उद्धव यांनी मार्गदर्शन केलं. या बैठकीला नगरविकास विभागाबरोबरच मंत्रालयातील इतर संबंधित खात्यांचं अधिकारीही उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मात्र १९९९नंतर राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री नसल्यानं मुंबई महापालिकेत अनेक निर्णय होऊनही ते पुढे मार्गी लागले नसल्याच्या तक्रारी शिवसेना नगरसेवकांकडून येत होत्या.

महत्त्वाच्या विषयांवर चर्चा

या बैठकीत कोस्टल रोड, महापालिकेतील मालमत्ता करमाफी, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणं, विकास आराखड्यातील नगरसेवकांच्या सूचना मान्य करणं, जलविद्युत केंद्राच्या निर्मितीसाठी परवानगी, कचराभूमीसाठी भूखंड अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचं समजतं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्प वेळेत मार्गी लावण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. तसंत, विविध खात्यांनी एकत्रित येऊन समन्वय साधण्याबाबतही सांगितल्याचं समजतं.



हेही वाचा -

नागरिकत्व कायद्याविरोधात काँग्रेसचा फ्लॅग मार्च

... म्हणून एअर इंडियाच्या वैमानिकांनी दिली नोकरी सोडण्याची धमकी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा