Advertisement

... म्हणून एअर इंडियाच्या वैमानिकांनी दिली नोकरी सोडण्याची धमकी

आधीच एअर इंडिया कर्जाच्या ओझ्याखाली आहे. आता तर वैमानिकांनी सेवा नियम आणि थकीत पगारावरून रोष व्यक्त केला आहे.

... म्हणून एअर इंडियाच्या वैमानिकांनी दिली नोकरी सोडण्याची धमकी
SHARES

सरकारी विमान कंपनी एअर इंडियाच्या समस्या काही संपता संपेनात. आधीच एअर इंडिया कर्जाच्या ओझ्याखाली आहे. आता तर वैमानिकांनी सेवा नियम आणि थकीत पगारावरून रोष व्यक्त केला आहेवैमानिकांची संघटना इंडियन कमर्शिअल पायलट असोसिएशननं (आयसीपीए) अनिश्चिततेच्या वातावरणात काम करणं शक्य नसल्याचं सांगत नोकरी सोडण्याचा इशारा दिला आहे.

वेळेत वेतन मिळत नसल्यानं आतापर्यंत ६५ वैमानिकांनी राजीनामे दिले आहे आणि सध्या ते नोटीस पिरिअडवर काम करत आहेत. नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांना पत्र लिहून इंडियन कमर्शिअल पायलट असोसिएशननं थकीत पगार देण्याची मागणी केली आहे. लवकरात लवकर थकीत पगार द्यावा किंवा नोटीस पिरिअडशिवाय नोकरी सोडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे

३१ मार्चपर्यंत एअर इंडियाची विक्री न झाल्यास कंपनी बंद करावी लागेल हे सरकारचं वक्तव्य योग्य नाही. अशा अनिश्चिततेच्या वातावरणात काम करणं शक्य नाही. त्यामुळे सरकारनं आम्हाला कोणत्याही नोटीस पिरिअडशिवाय नोकरी सोडण्याची परवानगी द्यावी. वेतन मिळत नसल्यानं अनेकांचे कर्जाचे हप्ते थकीत असल्याचंही संघटनेनं म्हटलं आहे.



हेही वाचा

'जेट एअरवेज'चं विमान पुन्हा होणार टेक आॅफ?

गोएअरची उड्डाणं पुन्हा रद्द, प्रवासी संतप्त


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा