Advertisement

एसटी महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकावर 'नाथजल'

'नाथजल' नावानं हे बाटलीबंद पाणी १० आणि १५ रुपयांत एसटीच्या सर्व बस स्थानकांत उपलब्ध होणार आहे.

एसटी महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकावर 'नाथजल'
SHARES

आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळानं आपल्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. अशातच आता एसटीनं बाटलीबंद पाण्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. 'नाथजल' नावानं हे बाटलीबंद पाणी १० आणि १५ रुपयांत एसटीच्या सर्व बस स्थानकांत उपलब्ध होणार आहे. बाटलीबंद पाणीपुरवठ्यासाठी पुण्यातील एका खासगी संस्थेची निवड केली आहे. या योजनेचे लोकार्पण परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आले.

या योजनेअंतर्गत महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकावर महामंडळाचे पेयजल उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची महान परंपरा लाभली आहे. त्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या गुरूला ‘नाथ’ या नावानं संबोधलं जातं. त्यांच्या आदराप्रीत्यर्थ एसटीच्या अधिकृत बाटलीबंद पेयजलास नाथजल हे नाव देण्यात आल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं.

सर्व बस स्थानकांवर ६५० मिलिलिटर व १ लिटर बाटलीबंद स्वरूपामध्ये नाथजल विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. यांचा दर अनुक्रमे १० रुपये व १५ रुपये इतका असेल, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. टप्प्याटप्प्याने राज्यातील सर्व बस स्थानकांवर हे पेयजल उपलब्ध होणार आहे.

यातून प्रत्येक ६५० मिलिलिटर बाटलीबंद पाण्यामागे ४५ पैसे आणि एक लिटल बाटलीबंद पाण्यामागे एक रुपये एसटीला मिळणार आहे. गेले २ महिने १ हजार बससाठी सुमारे ४ हजार ५०० पेक्षा अधिक एसटी कर्मचारी  बेस्ट वाहतुकीच्या सेवेत आहेत. त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था एका खासगी संस्थेला देण्यात आली होती.

कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ व संबंधित कंपनीकडून जेवण पुरविण्याची वेळ यामध्ये तफावत असल्यानं जेवणाबाबतच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्याबाबत अनेक तक्रारी कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या. याची दखल घेऊन सदर कंपनीचे जेवणाचे कंत्राट तातडीने रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना दररोज रोखीने भोजनभत्ता देण्यात यावा असे निर्देश दिले आहेत.

कर्मचारी राहत असलेल्या निवासव्यवस्थेची रोज पाहणी करण्यासाठी ७ पथकं तयार करण्यात आली असून, त्यांच्याद्वारे कर्मचाऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या निवासव्यवस्थेबाबत अहवाल सादर करण्यात येणार आहे. बेस्टच्या सेवेत असलेल्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार दररोज भोजनभत्ता देण्यात यावा, असे निर्देश परब यांनी दिले आहेत.

गेले २ महिने १ हजार बससाठी सुमारे ४ हजार ५०० पेक्षा अधिक एसटी कर्मचारी मुंबईतील बेस्ट वाहतुकीच्या सेवेत आहेत. त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था एका खासगी संस्थेला देण्यात आली होती. कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ व संबंधित कंपनीकडून जेवण पुरविण्याची वेळ यामध्ये तफावत असल्याने  अनेक तक्रारी कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा