एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून सॅनिटायझरचा वापर सुरू

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटी महामंडळाकडून एसटी बस धुण्यास आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून सॅनिटायझरचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे.

एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून सॅनिटायझरचा वापर सुरू
SHARES

मुंबईसह राज्यभरात एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. अनेक प्रवाशी सोयीचा व कमी दरात प्रवास म्हणून एसटीनं प्रवास करतात. त्यामुळं या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटी महामंडळाकडून एसटी बस धुण्यास आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून सॅनिटायझरचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा एसटीचा प्रवास निर्जंतुकीकरण केलेल्या बसमधून सुरू झाला आहे. 

एसटी महामंडळाकडून कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. एसटीच्या प्रवासामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बसस्थानके धुणं, एसटी कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरची बाटली देणं, अशा खबरदारीच्या सूचना परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिल्या होत्या. मात्र एसटी महामंडळाकडून या सूचनांचं पालन एक दिवसासाठी करण्यात आलं.

कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून एसटी सेवा पुरविण्यात येत आहे. या प्रवाशांचा एसटीचा प्रवास सुरक्षित आणि कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी गाड्याची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई सेंट्रल आगारातील सफाई कर्मचाऱ्यांकडून एसटी बसचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. यासह सॅनिटायझरच्या बाटल्यांचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.

संबंधित विषय