Advertisement

एसटी महामंडळाला मिळणार २७० कोटींची थकबाकी

मागील वर्षभरापासून राज्य सरकारकडे प्रलंबित असलेली २७० कोटींची थकबाकी महामंडळाला लवकरच मिळणार आहे.

एसटी महामंडळाला मिळणार २७० कोटींची थकबाकी
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं. या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील सर्व वाहतूक सेवा बंद होती. केवळ एसटी मंडळाच्या एसटीची राज्यातील विविध भागात अडकडलेल्या परप्रांतिय नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी वाहतूक सेवा सुरू होती. तसंच, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यासाठी ही सेवा सुरू होती. दरम्यान, या कोरोनामुळं एसटी आणखी मोठा तोटा सहन करावा लागत आहे. परिणामी राज्य परिवहन महामंडळाला काहीसा दिलासा देणारी एक बाब आहे. मागील वर्षभरापासून राज्य सरकारकडे प्रलंबित असलेली २७० कोटींची थकबाकी महामंडळाला लवकरच मिळणार आहे.

लॉकडाऊननंतर राज्यातील परिवहन सेवा जवळपास बंदच आहे. प्रवासासाठी घातलेल्या विविध अटींमुळे नागरिकांनी त्याकडं पाठ फिरवली आहे. त्यामुळं प्रवाशांअभावी बहुतांश बस स्थानकातच थांबून आहेत. त्यामुळं आर्थिक डबघाईला आलेल्या एसटी महामंडळाला प्रलंबित थकबाकी मिळाल्यानं थोडा दिलासा मिळणार आहे.

गृह विभागानं या संदर्भातील आदेश नुकतेच जारी केले आहेत. महामंडळातर्फे प्रवाशांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. त्याची रक्कम सरकारकडून दिली जाते. गेल्या आर्थिक वर्षातील थकबाकी देण्यासाठी महामंडळाकडून पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर या वर्षाच्या आर्थिक तरतुदीतून ही रक्कम वर्ग करण्याला गृह विभागानं हिरवा कंदील दाखविला असल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या आर्थिक वर्षामध्ये विविध प्रकारच्या प्रवाशांना एसटी महामंडळाने दिलेल्या सवलतींपैकी २७० कोटींची रक्कम अद्याप मिळालेली नव्हती. त्यासाठी गृह विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी तरतूद केलेल्या रकमेतून २७० कोटी एसटीला थकबाकीच्या बदल्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



हेही वाचा -

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द, 'या' योजनेवर परिणाम

यंदा सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक पावसाची शक्यता



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा