Advertisement

'या' मार्गावर धावणार नवी एसटी बस


'या' मार्गावर धावणार नवी एसटी बस
SHARES

एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता परळ-पाटगाव या मार्गावर नवी एसटी बस धावणार आहे. ही बस गुजरात एसटी महामंडळाच्या धर्तीवर राज्याच्या एसटी महामंडळात दाखल करण्यात आली आहे. सीटर कम स्लीपर बस (शयनयान आणि आसन) ही बस मंगळवारी परळ-पाटगाव या मार्गावर मार्गस्थ करण्यात येणार आहे.

लोकार्पण सोहळा

मुंबईतील परळ स्थानकात या बसचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर, संध्याकाळी ५ वाजता ही बस सोडण्यात येणार आहे.

थेट सेवा

पाटगाव हे गाव कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेला ९० किमी अंतरावर रांगणा किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. ट्रेकिंगची आवड असलेल्या मुंबईकरांना या बसमुळे थेट सेवा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास एसटी महामंडळानं व्यक्त केला.


हेही वाचा -

राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक, सत्ता स्थापनेचा पेच सुटणार?

'गुड न्यूज' चित्रपटाचा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा