Advertisement

शैक्षणिक सहलींचा एसटी महामंडळाला दिलासा

शैक्षणिक सहलींमुळे एसटीला तब्बल ६० कोटी रुपयांचा महसूल मिळाला

शैक्षणिक सहलींचा एसटी महामंडळाला दिलासा
SHARES

राज्यभरातील प्रवाशांना कमी दरात प्रवासी सुविधा देणाऱ्या एसटी महामंडळाच्या (MSRTC) उत्पन्नात वाढ होत आहे. त्यासाठी एसटी महामंडळाला शैक्षणिक सहलींचा (School Picnic) दिलासा मिळाला आहे. २०१९-२० या वर्षात शैक्षणिक सहलींमुळे एसटीला तब्बल ६० कोटी रुपयांचा महसूल मिळाला. २०१८-१९ च्या तुलनेने यामध्ये तब्बल ३६ कोटींनी वाढ झाली आहे. शालेय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून शैक्षणिक सहलींचं आयोजन करण्यात येतं.

शैक्षणिक सहलीसाठी ग्रामीण भागात सर्वप्रथम एसटी महामंडळाची लालपरी डोळ्यासमोर येते. परंतु, घडलेल्या अपघातांमुळं शिक्षण विभागानं सहलीसाठी एसटीकडं पाठ फिरविली होती. मुरूड येथील समुद्र किनाऱ्यावर झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागानं २०१८-१९ मध्ये शैक्षणिक सहलींसंदर्भात परिपत्रक जारी केले.

सहल कोणत्याही पर्यटन अथवा मनोरंजन स्थळावर घेऊन जाण्यास या परिपत्रकाद्वारे बंदी घातली होती, मुलांचा विमा काढणे, त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे, पालकांचे हमीपत्र, प्राचार्यांचे संमतीपत्र सादर करणे, अशा अनेक किचकट अटींमुळे शाळांकडून सहलींचे आयोजन करणे टाळण्यात येत होतं.

सहली टाळल्यानं त्याचा फटका एसटी महामंडळावर झाला. २०१७-१८ मध्ये एसटीला शालेय सहलींमधून ६३ कोटी उत्पन्न प्रतिपूर्ती रकमेसह मिळाले होते, त्यात घट होऊन २०१८-१९ मध्ये ते थेट २४ कोटींवर आले. त्यामुळं राज्य परिवहन महामंडळाचा महसूल वाढविण्यासाठी महामंडळाच्या प्रशासनानं कंबर कसली. विभागस्तरावर अधिकारी नियुक्त करुन आगारप्रमुख आणि अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांची भेट घेऊन समुपदेशन केलं. एसटी सरकारी असून विम्याची सोय आहेच, शिवाय विद्यार्थी, शाळांना नुकसान होणार नाही असे आश्वासित केले होते.हेही वाचा -

दादरकरांना घराजवळ करता येणार गाड्या पार्क

गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा बोटीचा प्रवास महागलासंबंधित विषय
Advertisement