Advertisement

गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा बोटीचा प्रवास महागला

गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा प्रवासासाठी प्रवाशांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा बोटीचा प्रवास महागला
SHARES

गेट वे ऑफ इंडिया (Gateway Of India) ते मांडवा (Mandwa) प्रवासासाठी प्रवाशांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहे. कारण या गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा (अलिबाग) दरम्यानचा जलप्रवास आता महागला आहे. जलप्रवासी वाहतुकीच्या दरात १५ ते २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसंच, मुंबईहून एलिफंटा (Elephanta) दरम्यानच्या आरामदायी जलवाहतुकीच्या दरात १० टक्के वाढ करण्यात आली आहे. याबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टनं (Mumbai Port Trust) सुधारीत दरपत्रकांची (Ticket Rates) घोषणा केली आहे.

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा मार्गावर जलप्रवासी वाहतूक केली जाते. दरवर्षी जवळपास १० लाख प्रवासी या जलवाहतूकीनं प्रवास करतात. या प्रवासी सेवेसाठी पूर्वी १४५ ते १९५ रुपयांचा दर आकारला जात होता. मात्र, यात २० रुपये प्रवासी कर आणि ५ रुपये सुरक्षा कराचा समावेश होता. त्यामुळं या जलवाहतुकीसाठी (Water Transport) १६५ ते २१५ रुपये मोजावे लागणार आहेत.

तिकिट दरांत १५ टक्के वाढ करण्यात आली आहे. तर मुंबईहून एलिफंटा बेटावर जाणाऱ्या डिलक्स बोटींच्या दरात १५ ते २० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळं प्रवाशांचा खिशाला कात्री बसणार आहे.

दरवाढ

मुंबईते मांडवा (अलिबाग)

पूर्वीचा दर हा १४५ ते १९५ रुपयांच्या घरात होता या दरांमध्ये आता २५ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता मुंबई ते अलिबाग बोटीने प्रवास करण्याचं तिकिट हे आता १६५ ते २१५ रुपयांचे असणार आहे

गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा

गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटा बेटावर जाणाऱ्या डिल्कस बोटींचे तिकिट दर १५ ते २० रुपयांनी महाग झाले आहेत.



हेही वाचा -

मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार आरामदायी

राज्यात उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना ड्रेस कोड



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा