Advertisement

राज्यात उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना ड्रेस कोड


राज्यात उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना ड्रेस कोड
SHARES

राज्यभरात अनेक वर्दळीच्या ठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थ विकली जातात. ही खाद्यपदार्थ उघड्यावर असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य जास्तीत जास्त सुरक्षित राहवे यादृष्टीने त्यावर भर दिला जाणार आहे. तसच, उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर निर्बंध आणण्यासाठी लवकरच त्यांना ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे.

याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मंगळवारी विधान परिषदेत माहिती दिली असून, या ड्रेसकोडमध्ये त्यांना विशिष्ट गणवेष, हातमोजे, टोपी आदींचा समावेश असणार आहे. 

अन्न सुरक्षा व मानके सुधारणा विधेयकावरील चर्चेच्या उत्तरात शिंगणे बोलत होते. या विधेयकामुळे आयुक्तांनी केलेल्या निर्णयावर दाद मागण्यासाठी संबंधितांना मंत्री वा राज्यमंत्र्यांकडे अपील करता येणार आहे. आयुक्त तसेच मंत्र्यांना यावर ८ ते १० दिवसांत निर्णय घ्यावयाचा आहे, असे ते म्हणाले. 

दुधातली भेसळ रोखण्यासाठी दुग्धविकास तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी संयुक्तपणे विविध डेअरींमध्ये तपासण्या करतील. प्रत्येक डेअरी महिन्यातून किमान एकदातरी तपासली जाणार असल्याच त्यांनी म्हटलं.

दरम्यान याआधी झालेल्या चर्चेत जयंत पाटील यांनी कायद्यातली सुधारणा म्हणजे अधिकाऱ्यांची दिवाळी असल्याचा आरोप केला. गेल्या १० वर्षांत या विभागाने किती कारवाई केली आणि किती जणांना शिक्षा झाली याचे प्रमाण बघितल्यास ते ०.१ टक्काही नसेल, असं त्यांनी म्हटलं.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा