Advertisement

वर्षभरात शिवशाहीचे 'इतके' अपघात; ५ मृत्यू तर १२६ जखमी


वर्षभरात शिवशाहीचे 'इतके' अपघात; ५ मृत्यू तर १२६ जखमी
SHARES

गेल्या वर्षभरात शिवशाहीचे १३१ अपघात झाले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर १२६ जखमी झाले आहेत. झालेल्या अपघातांमध्ये एसटी महामंडळाच्या मालकीच्या शिवशाही बसचे अपघातच अधिक आहेत. एसटी महामंडळानं जून २०१७ मध्ये शिवशाही या एसी बस दाखल केल्या.

एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ मध्ये शिवशाहीचे सुमारे २२१ अपघात झाले. त्याआधीच्या वर्षी ही संख्या २४० होती. अपघात घटले तरी त्याला पूर्णपणे आळा बसला नाही. सध्या एसटीच्या ताफ्यात मालकीच्या ९०० बस आणि भाडेतत्वावरील ४०० बस आहेत.

राज्यात २०-२१ मध्ये एप्रिल ते मार्च शिवशाहीचे १२४ अपघात झाले. यात ११७ अपघात एसटीच्या मालकीच्या बसचे, तर भाडेतत्वावरील बसचे ७ अपघात झाले. यामध्ये ११९ जण जखमी आणि ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. एप्रिल २०२१ ते जून २१ पर्यंत एकूण ७ अपघात झाले. यामध्येही एसटीच्या शिवशाहीचे ४ आणि भाडेतत्वावरील ३ बसचे अपघात असून ७ जण जखमी झाले. यातील ५३ अपघात हे किरकोळ आहेत.

१ लाख किलोमीटरमागे ०.१६ एवढे अपघाताचे प्रमाण असून अपघात कमी होत असल्याचे सांगितले. कंपनीकडून कंत्राटी चालक नेमण्यात येतात. वेगानं वाहन चालविणे, ओव्हरटेक करणे इत्यादी प्रकारे अपघात झाल्याची नोंद सुरुवातीपासूनच होत आहे. शिवशाही चालवताना एसटीच्या चालकांना सुरुवातीपासूनच समस्या येत होती. त्यामुळे चालकांच्या प्रशिक्षणाबाबतच मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे महामंडळाने या बसच्या चालकांना सेवेत आल्यापासून प्रशिक्षण देण्याचे कामही टप्प्याटप्प्यात सुरू केले.

भाडेतत्त्वावरील शिवशाही बस पुरवणाऱ्या कंत्राटदारांनी परतीच्या प्रवासात नवीन चालक देण्याची सूचनाही केल्याने त्यावर चालक देण्याचे काम केले. कोरोनाकाळात एसटीच्या शिवशाही कमी प्रमाणात धावल्या.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा