Advertisement

ST कडून १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ, परिपत्रकातून केलं जाहीर

एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातून याबाबतचं पत्रक विभागीय कार्यालयांना पाठवण्यात आलं आहे.

ST कडून १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ, परिपत्रकातून केलं जाहीर
SHARES

कोरोना व्हायरसच्या संकटकाळात लॉकडाऊन लागू करण्यात आला. लॉकडाऊन काळात अर्थव्यवस्था कोलमडली. त्यामुळे अनेक उद्योग-धंदे बंद पडले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यात आणखी भर म्हणजे एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊनमुळे सुमारे १० हजार कर्माचाऱ्यांना नारळ दिला आहे. एसटी महामंडळानं याबाबत एक पत्रक जारी केलं आहे. एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातून याबाबतचं पत्रक विभागीय कार्यालयांना पाठवण्यात आलं आहे. महामंडळानं घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

जवळपास ८ हजार ५०० वाहक, चालकांसह इतर कर्मचाऱ्यांची सेवा खंडीत करण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांच प्रशिक्षण सुरु आहे, अशांना थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोना लॉकडाऊनमुळे एसटी बंद असल्याने उत्पन्न ठप्प झालं आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. २०१९ मध्ये भरती झालेले चालक-वाहक यांची सेवा तात्पुरती खंडित करावी, भविष्यात गरज असेल तर ज्येष्ठतेनुसार पुन्हा सेवेत घ्यावे, चालक-वाहक, सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, अन्य अधिकारी किंवा अनुकंपा तत्वावरील जे उमेदवार प्रशिक्षण घेत असतील, त्याचे प्रशिक्षण थांबवावे, कोरोना संकट टळल्यानंतर पुढील परिस्थिती पाहून या कर्मचाऱ्यांना पुन्हा ज्येष्ठतेनुसार सेवेत घेतलं जाईल, असं या पत्रकात म्हटलं आहे.



हेही वाच

MSRTC Covid Center एसटीच्या कर्मचाऱ्यांंसाठी मुंबई सेन्ट्रल आगारात कोरोना केंद्र

कोरोनामुळं एसटीच्या वाहतूक सेवेवर परिणाम

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा