Advertisement

कचऱ्यापासून केलेली वीजनिर्मिती वाहनांच्या चार्जिगसाठी

राज्याचे पर्यावरण मंत्री, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले.

कचऱ्यापासून केलेली वीजनिर्मिती वाहनांच्या चार्जिगसाठी
SHARES

हाजी अली येथे गेल्यावर्षी सुरू झालेल्या या छोटय़ा वीजनिर्मिती प्रकल्पाला आता इलेक्ट्रिक व्हेईकल फास्ट चार्जिग स्टेशनची जोड देण्यात आली आहे. अशा स्वरूपाचे भारतातील हे पहिलेच चार्जिग स्टेशन आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले.

दीड हजार चौरस फुटाच्या जागेवर पालिकेच्या डी विभाग कार्यालयाने दररोज दोन मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प सप्टेंबर २०२१ मध्ये सुरू केला होता. हाजीअली आणि महालक्ष्मी रेसकोर्स जवळ असलेल्या माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यानाजवळ हा प्रकल्प आहे.

विभागातील कचरा या छोटय़ा प्रकल्पात जिरवून त्यातून वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. तेव्हापासून आतापर्यंत दीड लाख किलोपेक्षा अधिक टाकून दिलेल्या अन्नपदार्थावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती करण्यात आली आहे.

या प्रकल्पातील विजेचा वापर करून आता गाडय़ांसाठी चार्जिग स्टेशन सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले.

आदित्य ठाकरे म्हणाले की, टाकून दिलेल्या अन्नपदार्थापासून निर्मिती करण्यात आलेल्या विजेचा उपयोग करून इलेक्ट्रिक व्हेईकल चार्ज करणारे भारतातील हे पहिलेच केंद्र आहे. अशा स्वरुपाचे केंद्र केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यातील शक्य त्या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विशेषत: महामार्गावर त्याचा प्राधान्याने विचार केला जाईल.

या प्रकल्पामध्ये दररोज २ मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून ३०० ते ५०० युनिट वीज तयार होऊ शकते. या ठिकाणी चार्जिगसाठी दोन पॉईंट उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे एका वेळी दोन वाहने आणि तेही जलद गतीने चार्ज होवू शकतील. दिवसाला सहा गाडय़ा चार्ज होऊ शकतात.



हेही वाचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! 'हा' उड्डाणपूल दर आठवड्याच्या शेवटी वाहतुकीसाठी बंद

कुर्ल्यातील 'या' भागात दोन दिवस पाणीकपात

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा