बस ड्रायव्हर, कंडक्टर आणि बेस्ट योजनेअंतर्गत भाडेतत्त्वावर दिलेल्या बसमध्ये काम करणाऱ्या इतर कामगारांनी संप केला. बेस्ट प्रशासनाने (best) या कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी कामगार म्हणून समाविष्ट केले जावे अशी यांची मागणी आहे.
बेस्टच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या कंत्राटी तत्त्वावरील बसचालकांना बेस्टमध्ये सामील होईपर्यंत ‘समान काम, समान वेतन’ देण्यात यावे, या मागणीसाठी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली बेस्टच्या वडाळा आगर येथे मोर्चा (protest) काढण्यात आला.
यामध्ये डागा ग्रुप, बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड, हंसा सिटी बस सर्व्हिसेस, मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट लिमिटेडचे आदी सर्व कर्मचारी एकत्र आले. बेस्टला सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे बेस्ट प्रशासन, मुंबई (mumbai) महापालिका (bmc) आणि राज्य सरकारचे लक्ष वेधले. बेस्ट योजनेतील कामगारांना कायमस्वरूपी बेस्ट योजनेत समाविष्ट होईपर्यंत 'समान काम, समान वेतन' या तत्त्वावर वेतन मिळावे अशी मागणी केली.
कायमस्वरूपी व नियमित कामगारांना लागू असलेल्या वेतन व इतर सेवा सवलती कंत्राटी कामगारांना बरोबरीने तातडीने लागू कराव्यात, अशी मागणी करत कंत्राटी कामगारांनी आंदोलन केले.
हेही वाचा