Advertisement

सीएसएमटी-नरीमन पॉइंट दरम्यान बेस्टची नवीन एसी बस सेवा सुरू

सोमवार ते शनिवार (सार्वजनिक सुट्ट्यांसह) या बस मार्गावर बसेस धावतील.

सीएसएमटी-नरीमन पॉइंट दरम्यान बेस्टची नवीन एसी बस सेवा सुरू
SHARES

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन बेस्टने 17 मार्चपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते फ्री प्रेस हाऊस (नरीमन पॉइंट) दरम्यान नवीन वातानुकूलित बस मार्ग क्रमांक 'A-100' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बसचा मार्ग छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस – डॉ. दादाभाई नौरोजी मार्ग – हुतात्मा चौक – अहिल्याबाई होळकर चौक (चर्च गेट) – हुतात्मा राजगुरू चौक (मंत्रालय) – फ्री प्रेस जर्नल मार्ग – फ्री प्रेस हाऊस असा असेल.

सीएसएमटीहून पहिली बस सकाळी ८:०० वाजता सुटेल आणि शेवटची बस रात्री ८:४५ वाजता सुटेल. फ्री प्रेस हाऊस येथून पहिली बस सकाळी 8:15 वाजता सुटेल आणि शेवटची बस रात्री 9:00 वाजता सुटेल.

सोमवार ते शनिवार (सार्वजनिक सुट्ट्यांसह) या बस मार्गावर बसेस धावतील. प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे.हेही वाचा

वसई-विरारमध्ये 61 नवीन इलेक्ट्रिक बसेस धावणार

मुंबई लोकलमध्ये प्रवाशाचा दारू पितानाचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांनी...

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा