Advertisement

मुंबई लोकलमध्ये प्रवाशाचा दारू पितानाचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांनी...

मुंबई लोकलने दररोज लाखो लोक प्रवास करतात. काही लोक नियम झुगारून मुंबई लोकलमध्ये प्रवास करतात.

मुंबई लोकलमध्ये प्रवाशाचा दारू पितानाचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांनी...
SHARES

मुंबई लोकलचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. लोकांसाठी मुंबईची लोकल ट्रेन ही शहराची जीवनवाहिनी आहे. मुंबई लोकलने दररोज लाखो लोक प्रवास करतात. काही लोक नियम झुगारून मुंबई लोकलमध्ये प्रवास करतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती मुंबई लोकलमध्ये नियमांची पायमल्ली करत आहे. (Video of Man Drinking Alcohol Inside Luggage Compartment of Mumbai Local Train)

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये लोकल ट्रेनच्या डब्यात एक माणूस दारू पिताना दिसत आहे. एका युजरने ट्विटरवर याचा व्हिडिओ शेअर करून मुंबई पोलिसांना त्याच्यावर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

व्हिडिओ शेअर करताना एका ट्विटर यूजरने लिहिले की, "मुंबई पोलीस, दोन दिवसांपूर्वी मी लोकल ट्रेनमधून प्रवास करत होतो. ही घटना वडाळा रोड ते पनवेल स्टेशनपर्यंत घडलीयावर मुंबई पोलीस काय कारवाई करणार? लोकल ट्रेनमध्ये दारू पिणे कायदेशीर आहे का? मुंबई पोलीस काय कारवाई करणार?" व्हिडिओमध्ये प्रवासी काळ्या पॉलिथिनच्या पिशवीत गुंडाळलेल्या बाटलीतून दारू पिताना आणि फोनवर बोलताना दिसत आहे.

मुंबई लोकल ट्रेन हे प्रवाशांसाठी सर्वात कार्यक्षम आणि सोयीस्कर वाहतुकीचे साधन आहे, दररोज 7 दशलक्षाहून अधिक लोक तिचा वापर करतात. लोकल ट्रेनचे नेटवर्क पश्चिम, मध्य आणि हार्बर या तीन मार्गांवर पसरलेले आहे आणि 400 किमी पेक्षा जास्त अंतर व्यापते. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत गाड्या धावतात.



हेही वाचा

ठाणे ते डोंबिवली पश्चिमेला नवीन बस मार्ग सुरू

उल्हासनगर मेट्रो स्थानकाचे नाव ‘सिंधू नगर’ होणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा