वरळीच्या (Worli) मच्छिमारांच्या (fishermen) मागणीनंतर संरेखनात बदल केल्यामुळे मुंबई कोस्टल रोड (Mumbai Coastal Road) प्रकल्पाला आणखी विलंब लागणार आहे. त्यामुळे, प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर (Princess street Flyover) ते वांद्रे-वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंतचा रस्ता मे २०२४ पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, कोस्टल रोडचे काम पूर्ण गतीने सुरू आहे आणि ते 31 मे 2024 पर्यंत खुले होऊ शकते. मात्र, यावेळी झालेल्या विलंबामुळे प्रकल्पाचा खर्च वाढला नाही.
वरळीच्या मच्छिमारांनी त्यांच्या मासेमारी नौकांचे सुरळीत मार्गक्रमण करण्यासाठी दोन टोकांमधील अंतर वाढवण्याची मागणी केल्यानंतर हे बदल करण्यात आले आहेत. न्यायालयाचे विविध आदेश, 2020 ची कोविड-19 महामारी आणि कोळी मच्छीमारांचे आंदोलन यामुळे प्रकल्पाला विलंब होत आहे.
विधान परिषदेला दिलेल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडवरील टोल वसूल करण्याबाबत काहीही सांगितले नाही.
शिवाय, नियुक्त केलेल्या जनरल कन्सल्टंट कराराचा कालावधी आणि त्याला देण्यात आलेल्या अतिरिक्त कामांमुळे, जसे की, प्रस्तावित जलमार्गाच्या आराखड्याची छाननी करणे, एकात्मिक केंद्रीकृत नियंत्रण केंद्राचे पर्यवेक्षण आणि सुशोभीकरणाच्या कामासाठी सल्लागार इत्यादी कामांमुळे शुल्क वाढले आहे, असे उत्तरात म्हटले आहे.
तसेच वरळी येथील कोस्टल रोड पुलाच्या माध्यमातून वांद्रे वरळी सी लिंकला (Worli sea link) जोडला जाणार आहे.
हेही वाचा