Advertisement

अखेर परवानगी मिळाली! डबेवाल्यांच्या रेल्वे प्रवासाचा मार्ग झाला मोकळा

मागील ६ महिने रेल्वे सेवा बंद असल्याने डबेवाल्यांची सेवा ही कोलमडली. तसंच, आर्थिक चणचण वाढल्यानं अनेक डबेवाल्यांची उपासमार होऊ लागली.

अखेर परवानगी मिळाली! डबेवाल्यांच्या रेल्वे प्रवासाचा मार्ग झाला मोकळा
SHARES

कोरोनामुळं मुंबईत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या लॉकडाऊनमुळं हातावर पोट असलेल्या अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. मात्र, काही काळानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव हळुहळू नियंत्रणात येत असताना मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा (Mumbai Local) सुरू झाली. परंतु, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच ही सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर कंपन्याही सुरू झाल्या व त्या पार्श्वभूमीवर कर्मचारी वर्गही वाढला. असं असलं सामान्यांना लोकल प्रवासाची संधी नसल्यानं खिशाला कात्री लागत आहे. यामध्ये मुंबईच्या डबेवाल्यांचाही (Mumbaicha Dabbawala) समावेश होता. लॉकडाऊनचा (Lockdown) फटका मुंबईच्या डबेवाल्यांना मोठ्या प्रमाणात बसला.

मागील ६ महिने रेल्वे सेवा बंद असल्याने डबेवाल्यांची सेवा ही कोलमडली. तसंच, आर्थिक चणचण वाढल्यानं अनेक डबेवाल्यांची उपासमार होऊ लागली. त्यामुळं डबेवाल्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून लोकलनं प्रवास करून देण्याची मागणी मुंबई डबेवाला असोसिएशननं केली होती. राज्य सरकारनं शिफारस केल्यानंतर रेल्वेनं राज्य सरकारची विनंती मान्य करत डबेवाल्यांना रेल्वेने प्रवास करू देण्याचे मान्य केले. मात्र त्यासाठी आवश्यक क्युआर कोड नसल्याने डबेवाल्यांना रेल्वेने प्रवास सुरू करता करता आला नाही.

अखेर मंगळवारी मुंबई रेल्वे मंडळानं पत्र काढून डबेवाल्यांचा समावेश अत्यावश्यक सेवेत केला. इतकंच नाही तर अनेक डबेवाल्यांकडे अॅन्ड्रॉईड मोबाईल फोन नसल्याने त्यांना ओळखपत्रावर प्रवास करू देण्याची परवानगी ही देण्यात आली आहे. त्याबद्दल मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांच्याकडून राज्य सरकार तसेच रेल्वे प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

अथक प्रयत्नानंतर अखेर रेल्वेने मुंबईच्या डबेवाल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिल्याने डबेवाल्यांची सेवा आता सुरू होणार आहे. मुंबई रेल्वे मंडळाने पत्रक काढून डबेवाल्यांना आपल्या ओळखपत्रावर प्रवास करता येणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा