Advertisement

'त्या' रेल्वे प्रवाशांवर मध्य रेल्वेची दंडात्मक कारवाई

लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वेन दंडात्मक कारवाई केली आहे.

'त्या' रेल्वे प्रवाशांवर मध्य रेल्वेची दंडात्मक कारवाई
SHARES

लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वेन दंडात्मक कारवाई केली आहे. या करवाईतून मध्य रेल्वेनं १.५० कोटी रुपयांची वसुली केली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सघन, विशेष आणि नियमित तिकीट तपासणी करताना ४३ हजार ५१६ प्रकरणांतून १.५० कोटी रुपयांचा दंड वसुल केला.

अनधिकृत प्रवाशांचा गाड्यांमध्ये प्रवास होऊ नये यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत उपनगरी आणि विशेष लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये अनियमित प्रवासाविरूद्ध नियमित, गहन आणि विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येते. त्यानुसार, वरिष्ठ अधिकारी आणि तिकिट तपासणी कर्मचार्‍यांच्या पथकानं जून ते नोव्हेंबर या कालावधीत केलेल्या गहन, विशेष आणि नियमित तपासणी दरम्यान एकूण ४३,५१६ प्रकरणे आढळून आली आणि दंड म्हणून १.५० कोटी रुपयांची रक्कम मिळाली.

४३ हजार ५१६ पैकी उपनगरी गाड्यांमध्ये ३९ हजार ५१६ प्रकरणे आढळून आली असून, १.१० कोटी इतका दंड आणि लांब पल्ल्याच्या मेल/एक्सप्रेस गाड्यांमध्ये ४ हजार प्रकरणे आढळून आली आहेत व त्यातून ४० लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Read this story in English
संबंधित विषय