Advertisement

दादर स्थानकात होणार मोठा बदल, प्लॅटफॉर्म क्रमांक बदलणार

गोंधळ दूर करण्यासाठी प्रशासनाने आता एका ओळीत प्लॅटफॉर्म क्रमांक देण्याचा निर्णय घेतला आहे.

दादर स्थानकात होणार मोठा बदल, प्लॅटफॉर्म क्रमांक बदलणार
SHARES

दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांकावरुन प्रवाशांचा नेहमीच गोंधळ उडतो. हाच गोंधळ दूर करण्यासाठी प्रशासनाने आता एका ओळीत प्लॅटफॉर्म क्रमांक देण्याचा निर्णय घेतला आहे.

दादर रेल्वे स्थानकातील पश्चिम रेल्वेवरील प्लॅटफॉर्म क्रमांक तेच राहणार आहेत. मात्र, मध्य रेल्वेवरील प्लॅटफॉर्म क्रमांक बदलणार आहेत. अलीकडेच, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पश्चिम रेल्वेपासून एक क्रमांक ते मध्य रेल्वेच्या शेवटच्या प्लॅटफॉर्मपर्यंत म्हणजेच दादर टर्मिनसच्या प्लॅटफॉर्मपर्यंत अनुक्रमानुसार रांगेत क्रमांक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीनुसार पश्चिम रेल्वेच्या फलाट क्रमांकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पश्चिम रेल्वेचे प्लॅटफॉर्म 1 ते 7 पर्यंत तसेच राहणार आहेत. मात्र, मध्य रेल्वेच्या धीमा मार्गावरील पहिला प्लॅटफॉर्म आता आठ क्रमांकाचा असेल. त्यानुसारच इतर प्लॅटफॉर्मचे क्रमांक बदलण्यात येतील. दादर टर्मनसमधील प्लॅटफॉर्म क्रमांकही याचनुसार असणार आहेत. 

मध्य रेल्वेवरील प्लॅटफॉर्म क्रमांक आता आठ पासून सुरू होणार आहे. त्यामुळं टर्मिनसचा फलाट क्रमांक आता १५ असणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी तसं स्पष्ट केलं आहे. लवकरच स्थानकात तसे बदल करण्यात येतील, असंही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 

दादर रेल्वे स्थानकात झालेल्या या बदलाबाबत प्रवाशांना माहिती व्हावी यासाठी बदललेल्या प्लॅटफॉर्म क्रमांकासह सूचना स्थानकात वारंवार करता येतील.

तसंच, आधीच्या घोषणांमध्येही बदल करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पादचारी पूल आणि दिशादर्शक प्लॅटफॉर्मवरील क्रमांकही बदलण्यात येतील. नव्याने त्यावर क्रमांक टाकण्यात येतील, असंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

तसंच, दादर रेल्वे स्थानकात झालेल्या या बदलांमुळं प्रवाशांचा कोणताही गोंधळ उडणार नाही व त्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येईल, असं आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलं आहे.  



हेही वाचा

खार रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण मार्च 2024 पर्यंत पूर्ण होणार

मध्य रेल्वेवरील 'या' 15 स्थानकांचा होणार कायापालट

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा