Advertisement

लोकल प्रवासासाठी लागणारा पास; कुठे व कसा मिळणार? वाचा सविस्तर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या सर्वसामान्यांचा लोकल प्रवास सुरू करण्यात आला आहे.

लोकल प्रवासासाठी लागणारा पास; कुठे व कसा मिळणार? वाचा सविस्तर
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य सरकारनं आनंदाची बातमी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या सर्वसामान्यांचा लोकल प्रवास सुरू करण्यात आला आहे. परंतू, कोरोना प्रतिबंधक लसीच २ डोस पुर्ण झाले आहेत, याच प्रवाशांना प्रवासास मान्यता देण्यता आली आहे. मात्र, या प्रवासासाठी विशेष पासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी प्रवाशांना एका विशिष्ट अॅपच्या माध्यमातून हा पास मिळवता येणार आहे. शिवाय राज्य सरकार लवकरच या अॅपबाबत माहिती देणार आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, या पार्श्वभूमीवर येत्या १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना याबाबत घोषणा केली. 'प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसंच दुसरी लस घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना आपण १५ ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करता येईल. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी एका मोबाईल एपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. त्या अॅपबाबत लवकरच माहिती दिली जाईल', असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

अॅपच्या माध्यमातून हा पास मिळणार असल्यानं ज्यांच्याकडं स्मार्ट फोम नाही, अशा नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र, या नागरिकांसाठी ही सुविधा करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 'ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील महापालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील', असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

'अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी वारंवार लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. आपणा सर्वास माहीतच आहे की अद्याप आपण दुसऱ्या लाटेतून देखील पूर्णपणे सावरलेलो नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे. केंद्र सरकारने देखील आपणास वारंवार याबाबत इशारा दिला आहे. मात्र, तरीदेखील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत', असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा