Advertisement

‘व्हॉट्सअ‍ॅप करा, प्रश्न सोडवा’, मेट्रो 1च्या प्रवाशांसाठी योजना

मुंबई मेट्रो १ म्हणजेच घाटकोपर-वर्सोवा-घाटकोपर या मार्गिकेसाठी ही सेवा सुरू केली आहे

‘व्हॉट्सअ‍ॅप करा, प्रश्न सोडवा’, मेट्रो 1च्या प्रवाशांसाठी योजना
SHARES

मुंबई मेट्रो १ म्हणजेच घाटकोपर-वर्सोवा-घाटकोपर या मार्गिकेवरील प्रवाशांसाठी एक गुडन्यूज आहे.  ‘व्हॉट्सअ‍ॅप करा, प्रश्न सोडवा’, या प्रकारची योजना मेट्रो प्रशासनाने महाराष्ट्र दिनी आणली आहे.

मेट्रोच्या सेवा वेळापत्रकानुसार सुरू नसल्यास प्रवासी आधीच्या चार व आता व्हॉट्सअॅपसंबंधीची ही सेवा, यापैकी कुठल्याही तक्रार सुविधेचा वापर करू शकतात, असेही मुंबई मेट्रो वन ऑपरेशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने म्हटले आहे.

मुंबई मेट्रो वन ऑपरेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओओपीएल) ही कंपनी ही मार्गिका हाताळत आहे. प्रवाशांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी सध्या कंपनीने चारस्तरीय योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक स्थानकावर ग्राहक सेवा केंद्रासह ०२२-३०३१०९०० या कॉल सेंटरवर संपर्क साधता येतो.

त्याखेरीज ट्विटरवरही प्रवाशांना अडचणी मांडता येतात. तसेच customercare@reliancemumbaimetro.com ई-मेल आयडी कार्यान्वित आहे. आता मात्र त्याखेरीज व्हॉट्सअॅप करताच प्रवाशांच्या अडचणी दूर होणार आहेत.

कंपनीच्या प्रवक्त्यांनी याबाबत सांगितले की, ‘महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रवाशांसाठी शीघ्र प्रतिसाद योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. यासाठी सर्वाधिक वापराच्या व्हॉट्सअॅपचा आधार घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत प्रवासी ९९३०३१०९०० या क्रमांकावर कुठूनही संदेश पाठवू शकतात. त्याखेरीज स्थानकांवरील ग्राहक सेवा केंद्रात या व्हॉट्सअपचा क्यूआर कोड स्कॅन करूनही अडचणी, प्रश्न, शंका याबाबतचा संदेश पाठवता येईल. या संदेशाला प्रशासनाकडून तात्काळ उत्तर मिळेल व त्यानुसार प्रवासी मुंबई मेट्रो वनच्या कॉल सेंटरशी जोडला जाईल.’



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा