Advertisement

मुंबईत 'या' तारखेपासून धावणार मेट्रो

प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मेट्रोनं हा निर्णय घेतला आहे.

मुंबईत 'या' तारखेपासून धावणार मेट्रो
SHARES

राज्य सरकारनं लोकल सेवेप्रमाणे आता मुंबई मेट्रो (mumbai metro) सेवेला ही परवानगी दिली. बुधवारी राज्य सरकारनं नवीन नियमावली जाहीर करत १५ ऑक्टोबरपासून मुंबई मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती दिली. परंतू, मुंबई मेट्रो प्रशासनानं १९ ऑक्टोबरपासून मेट्रो सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मेट्रोनं हा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने (state government) जरी गुरुवारपासून मेट्रो सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी, मेट्रो प्रशासनानं १९ ऑक्टोबरला सकाळी ८.३० वाजता पहिली मेट्रो धावणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसं ट्विटचं मेट्रोनं केलं आहे. मुंबई मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. राज्यात आता लॉकडाऊनचे निर्बंध शिथील होत असताना, अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य सरकारने 'मिशन बिगिन अगेन' (mission begin again) अंतर्गंत अनेक सेवांना सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

मेट्रो सुरू होण्यापूर्वी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मेट्रोकडून स्वच्छता व इतर गोष्टींची तपासणी करण्यात येणार असून मेट्रोच्या ट्रायल रन घेण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी सोमवारी १९ ऑक्टोबरला मेट्रो दाखल होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशातील अन्य शहरांतील मेट्रोसेवा केंद्रांच्या परवानगीनंतर सप्टेंबरमहिन्यातच सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, मेट्रो सेवेबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. 

राज्य सरकारनं जरी मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी, मेट्रो सेवेसाठी नगरविकास विभागाने जी मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत ती या सेवेसाठी लागू असतील. त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असेही नमूद करण्यात आले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा