Advertisement

नॉन-पॉवर्ड मेट्रो कार गाड्यांसाठी शंटिंग ऑपरेशन

इलेक्ट्रिकल आणि नॉन-इलेक्ट्रिकल साधनं ही नॉन-पॉवर्ड मेट्रो कार गाड्यांसाठी शंटिंग ऑपरेशन करणार आहेत.

नॉन-पॉवर्ड मेट्रो कार गाड्यांसाठी शंटिंग ऑपरेशन
SHARES

चारकोप मेट्रो डेपोसाठीच्या नवीन रोड-रेल शंटर लोको आणि मूव्हरचं उद्घाटन एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव यांनी शनिवारी केलं. इलेक्ट्रिकल आणि नॉन-इलेक्ट्रिकल साधनं ही नॉन-पॉवर्ड मेट्रो कार गाड्यांसाठी शंटिंग ऑपरेशन करणार आहेत. रोड कम-रेल-मूव्हर (आरएमएम) आणि डिझेल शंटिंग लोको हे चारकोप मेट्रो डेपो कार्यशाळेत इलेक्ट्रिक मेट्रो ट्रेनच्या देखभालीसाठीचे ८ कार ट्रेन सेट खेचण्यास मदत करणार आहेत. चारकोप मेट्रो डेपो इथं ही लोकोमोटिव्ह सुरू करणारी आदिश्री ठाकरे ही पहिली ट्रेन ऑपरेटर आहे.

आरएमएम आणि रोड-कम-रेल डिझेल शंटिंग लोको हे विविध वैशिष्ट्यं आणि प्रगत सुरक्षा उपायांनी सुसज्ज आहेत. महत्त्वपूर्ण अशा देखभाल कामासाठी तसंच, मेट्रो गाड्यांची कामगिरी टिकवून ठेवण्यासाठी याची मदत होणार आहेत. यातून सुरक्षित आणि सुलभ प्रवास निश्चित होण्याबरोबरच एमएमआरडीएचं मुंबई इन मिनिट्स हे ध्येय साध्य करण्यास मदत होणार असल्याचा दावा एमएमआरडीएनं केला आहे.

रेल कम रोड मूव्हर हे बॅटरीचलित आहे. स्वतंत्र कारचं शंटिंग ऑपरेशन म्हणजे बाजूच्या रुळावर नेण्याची प्रक्रिया करण्यास सक्षम आहे. तर रोड कम रेल डिझेल शंटिंग लोकोमुळं ट्रेनचे सेट, वैयक्तिक कारची विद्युतविहीन अवस्थेत हालचाल करणं किंवा त्याला वाहून नेणं शक्य होणार. हे रेल्वे तसंच, रोडवर काम करू शकतं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा