Advertisement

मुंबई-नवी मुंबई 'वॉटर टॅक्सी' सेवेला अल्प प्रतिसाद

‘वॉटर टॅक्सी’ सेवेबाबत सर्व संबंधितांची बैठक २ मार्चला घेण्यात येणार आहे.

मुंबई-नवी मुंबई 'वॉटर टॅक्सी' सेवेला अल्प प्रतिसाद
SHARES

नवी मुंबई आणि मुंबई यांना जोडणाऱ्या ‘वॉटर टॅक्सी’सेवेला अल्प प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मिळत आहे. उद्घाटनानंतर दहा दिवसांत स्पीड बोटीच्या केवळ तीनच फेऱ्या झाल्या आहेत. तर कॅटमरानची प्रवाशांअभावी एकही फेरी झालेली नाही.

‘वॉटर टॅक्सी’ सेवेबाबत सर्व संबंधितांची बैठक २ मार्चला घेण्यात येणार आहे. त्यात या प्रश्नावर तोडगा काढला जाईल. भाऊचा धक्का ते दक्षिण मुंबईतील मुख्य ठिकाणांना जोडणाऱ्या सेवेचा प्रश्न आहे. भाऊचा धक्का इथून वाहतूक सेवा पुरवण्याची गरज काही प्रवाशांनी लक्षात आणून दिली आहे. त्यामुळे त्यावर विचार केला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

१७ फेब्रुवारी रोजी मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या जल टॅक्सी सेवेचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. बेलापूरला दक्षिण मुंबईच्या डोमेस्टिक क्रूझ टर्मिनलशी जोडणारी ही सेवा प्रवासाचा वेळ जवळपास ९० मिनिटांवरून २५ मिनिटांपर्यंत कमी करते.

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, सेवा सुरू झाल्यापासून १० दिवसांत, दोन ठिकाणी फक्त तीन ट्रिप गेल्या. स्पीड बोट जवळपास १२ जणांना सामावून घेऊ शकते आणि एकेरी प्रवासासाठी १,२१० मध्ये २५-३० मिनिटांत अंतर कापू शकते.

दुसरीकडे, catamaran मध्ये ४५ मिनिटांच्या प्रवासासाठी २९० रुपये आकारले जातात. यामध्ये ५६ प्रवासी प्रवास करू शकतात.

मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड (एमएमबी) आणि सिडको यांनी एकत्र येऊन प्रकल्पाचे काम केले होते. खात्यांच्या आधारे, बेलापूर जेट्टीवरील क्रियाकलाप जानेवारी २०१९ मध्ये सुरू झाला आणि सप्टेंबर २०२१ पर्यंत ८.३७ कोटी रुपये खर्चून पूर्ण झाला.

भविष्यात मार्गांचा विस्तार केला जाईल, असं यापूर्वी सांगण्यात आलं होतं. इतर मार्गांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल ते एलिफंटा, डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल ते रेवस, करंजाडे, धरमतर, डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल ते बेलापूर, नेरूळ, वाशी आणि ऐरोली आणि डीसीटी ते खांदेरी बेटे आणि जेएनपीटी यांचा समावेश आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.



हेही वाचा

प्रतीक्षानगर आगारासाठी वर्षभराचे अवघे १५०० रुपये भाडे

येत्या काळात सर्वानाच लोकल प्रवासाची परवानगी मिळणार?

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा