Advertisement

'डेक्कन क्विन'चा प्रवास होणार आणखी जलद

मुंबई-पुणे मार्गावरील प्रवाशांची पसंती असलेल्या डेक्कन क्विन एक्स्प्रेसचा प्रवास आता आणखी जलद आणि सुरक्षित होणार आहे.

'डेक्कन क्विन'चा प्रवास होणार आणखी जलद
SHARES

मुंबई-पुणे मार्गावरील प्रवाशांची पसंती असलेल्या डेक्कन क्विन एक्स्प्रेसचा प्रवास आता आणखी जलद आणि सुरक्षित होणार आहे. 'डेक्कन क्वीन'ला ताशी १६० किमी वेगानं धावण्यास पूरक लिकें हॉफमन बूश (एलएचबी) डबे जोडून 'डायनिंग कार' वातानुकूलित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच, इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) डब्यांची वेगानं धावण्याची क्षमता कमी असल्यानं 'एलएचबी' डबे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'आयसीएफ'चे डबे

मुंबई-पुणेदरम्यान प्रवासवेळ वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. याकरिता घाट मार्ग वगळता उर्वरित विभागातील अंतर वेगानं कापण्यासाठी मेल-एक्स्प्रेसचा वेग वाढवण्याचं मध्य रेल्वेचं नियोजन आहे. सध्या या मार्गावर धावणाऱ्या 'डेक्कन क्वीन'ला 'आयसीएफ'चे डबे आहेत. ते बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 'एलएचबी' धर्तीवर डायनिंग कारही वातानुकूलित असते. त्यामुळं 'डेक्कन क्वीन'मधील डायनिंग कार ही वातानुकूलित करण्यात येणार आहे.

डब्यांची वैशिष्ट्यं

मार्च मध्यावधीपर्यंत हे काम पूर्ण होणार असून, मार्चअखेरीस नव्या रूपातील 'डेक्कन क्वीन'मधून प्रवाशांना प्रवास करता येणे शक्य होणार असल्याची माहिती मिळते. प्रशस्त जागा, वजनानं हलकं, वेगवान प्रवासाची क्षमता ही एलएचबी डब्यांची वैशिष्ट्यं आहेत. त्यामुळं रेल्वे मंत्रालयाकडून 'आयसीएफ' डब्यांच्या जागी 'एलएचबी' डबे जोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काम पूर्ण

मध्य रेल्वेकडून यंदाच्या आर्थिक वर्षासाठी (२०१९-२०२०) एकूण १९ मेल-एक्स्प्रेसला 'एलएचबी' डबे जोडण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई-पुणे-सोलापूर प्रवाशांच्या पसंतीच्या उद्यान-सिद्धेश्वर एक्स्प्रेसचा समावेश आहे. त्यापैकी १० मेल-एक्स्प्रेसचे काम पूर्ण झालं असल्याची माहिती मिळते.



हेही वाचा -

बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आणखी १५ तेजस्विनी

'परे'च्या बम्बार्डियर लोकलच्या वेगात होणार वाढ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा