Advertisement

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याकडे जाणारी एक लेन सुरु

किलोमीटर ३९ वर ही दरड कोसळली. रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याकडे जाणारी एक लेन सुरु
SHARES

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर लागणाऱ्या बोरघाटात पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली. दरड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांची प्रचंड वर्दळ असल्यानं तातडीनं दरड हटविण्याचं काम हाती घेण्यात आलं, त्यानुसार, ही दरड हटविण्याचे काम सुरु असून एक लेनवरून वाहतूक सुरु करण्यात आल्याचं समजतं.

किलोमीटर ३९ वर ही दरड कोसळली. रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या दरड बाजुला करण्याचे काम सुरु असून वाहतूक धीम्या गतीनं सुरु करण्यात आली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांची प्रचंड वर्दळ असल्यानं तातडीनं दरड हटविण्याचं काम हाती घेण्यात आलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा