Advertisement

मुंबई-साईनगर शिर्डी दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्या


मुंबई-साईनगर शिर्डी दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्या
SHARES

मध्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी पुढील सूचना मिळेपर्यंत मुंबई - साईनगर शिर्डी दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्या चालविणार आहे.

02147 सुपरफास्ट विशेष दिनांक ५.३.२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दादर येथून दर शुक्रवारी २१.४५ वाजता सुटेल आणि साईनगर शिर्डीला दुसर्‍या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल.

02148 सुपरफास्ट विशेष विशेष दिनांक ६.३.२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत साईनगर शिर्डी येथून दर शनिवारी ०७.२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दादरला १३.२५ वाजता पोहोचेल.

थांबे

ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड आणि कोपरगाव.


संरचना

एक वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, दोन वातानुकुलीत तृतीय श्रेणी, ७ शयनयान, ७ द्वितीय श्रेणी आसन 

आरक्षण

पूर्णपणे राखीव असलेल्या 02147/02148 विशेष गाड्यांचे बुकिंग सामान्य भाडे दराने दिनांक ३.३.२०२१ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल.

उपरोक्त विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या सविस्तर वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.

केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा