Advertisement

प्रवाशांच्या खिशाला कात्री? रिक्षा-टॅक्सी संघटना भाडेवाढीसाठी प्रयत्नशील

या भाडेवाढीबाबात मंगळवारी चर्चा होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाऱ्या बैठकीत याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

प्रवाशांच्या खिशाला कात्री? रिक्षा-टॅक्सी संघटना भाडेवाढीसाठी प्रयत्नशील
SHARES

मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. मागील ५ वर्षांपासून न मिळालेली भाडेवाढ आणि कोरोनामुळं बसलेल्या आर्थिक फटक्यामुळं परिवहन विभागानं काळ्या-पिवळ्या रिक्षासाठी किमान २ रुपये, तर टॅक्सीसाठी ३ रुपये भाडेवाढ प्रस्तावित केली आहे. या भाडेवाढीबाबात मंगळवारी चर्चा होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाऱ्या बैठकीत याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीसाठी खटुआ समितीचे सूत्र वापरले जाणार आहे. या समितीच्या शिफारशी शासनानं स्वीकारल्यानं त्यातील भाडेदरासंदर्भात शिफारशींवरही होणाऱ्या बैठकीतही चर्चा केली जाणार आहे. शिफारशींमध्ये टॅक्सीसाठी सवलतींचे ८ टप्पे, तर रिक्षासाठी ४ टप्पे, काळ्या-पिवळ्या टॅक्सी सेवेत ८ किलोमीटरच्या पुढील टप्प्यासाठी १५ ते २० टक्के सवलत, भाडेदर दोन पटींपर्यंतच वाढवण्याची मुभा, मुंबई महानगर क्षेत्रात मध्यरात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत रिक्षा-टॅक्सीला भाडेवाढ नाही इत्यादींचा यात समावेश असणार आहे.

रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीसंदर्भात २२ डिसेंबरला परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत चर्चा होणार असून समितीकडून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी म्हटलं. याआधी रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ प्रत्येक वर्षी जूनमध्ये सरकारनं नेमलेल्या हकीम समितीच्या सूत्रानुसार होत होती.

सध्या काळ्या-पिवळ्या रिक्षाचं किमान भाडं १८ रुपये, तर टॅक्सीचं २२ रुपये भाडं आहे. रिक्षाच्या भाडेदरात २ रुपये आणि टॅक्सीच्या भाडेदरात ३ रुपयांची वाढ प्रस्तावित केली आहे. त्यामुळं रिक्षाचं भाडं २० रुपये आणि टॅक्सीचं भाडे २५ रुपये होणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मात्र प्राधिकरणाच्या बैठकीत होणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा