Advertisement

रिक्षा-टॅक्सी संघटना १ ऑगस्टपासून संपावर

यासंदर्भात मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) आशीषकुमार सिंह यांना पत्रही पाठविले आहे.

रिक्षा-टॅक्सी संघटना १ ऑगस्टपासून संपावर
SHARES

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सीएनजी दरात वाढ होत आहे. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी चालकांच्या दैनदिन उत्पन्नावर परिणाम होत असल्याने भाडेवाढ द्या, अशी मागणी मुंबईतील काळी-पिवळी रिक्षा, टॅक्सी संघटनांनी केली आहे.

यासाठी १ ऑगस्टपासून संपाचा इशाराही देण्यात आला आहे. यासंदर्भात मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) आशीषकुमार सिंह यांना पत्रही पाठविले आहे.

मार्च २०२१ मध्ये टॅक्सीचे भाडे २२ रुपये झाले. त्यानंतर यात तीन रुपयांची वाढ झाली आणि भाडे २५ रुपयांपर्यंत पोहोचले. त्यावेळी प्रति किलोग्रॅम ४८ रुपये असलेला सीएनजीचा दर हा आता प्रतिकिलोग्रॅम ८० रुपये झाला आहे. त्यामुळे उत्पन्न कमी, खर्च जास्त होत असून प्रत्येक टॅक्सी चालकाला रोज ३०० रुपये अतिरिक्त नुकसान होत आहे.

शासनाने रिक्षा टॅक्सी भाडेदर पुनर्रचनेसाठी नेमलेल्या खटुआ समितीनुसार सीएनजी दरात २५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्यास टॅक्सी चालकांना भाडेवाढ देण्याची सूचना आहे. आता सीएनजी दरात ३५ टक्केपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

सीएनजी दरात होत असलेल्या वाढीमुळे गेल्या काही महिन्यांपासून सात वेळा परिवहन मुख्य सचिवांकडे पत्र्यव्यवहार केला आणि त्याची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे भाडेवाढ करा, अशी मागणी पुन्हा केली आहे.

भाडेवाढ न मिळाल्यास १ ऑगस्टपासून संपावर जाऊ, असे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वाड्रोस यांनी सांगितले. टॅक्सी संघटनेने किमान भाडे दरात दहा रुपयांची वाढ मागितली आहे.

मुंबई रिक्षामेन्स युनियनचे सरचिटणीस तंबी कुरीयन यांनीही सीएनजी दरवाढीमुळे परिवहन विभागाकडे भाडेवाढीच्या मागणीसंदर्भात सातत्याने चर्चा केल्याचे सांगितले. मनसे रिक्षा संघटनांसह अन्य संघटनांशीही भाडेवाढ आणि संपाविषयी चर्चा केल्याचे ते म्हणाले.



हेही वाचा

पालिकेच्या मदतीनं मध्य रेल्वे बांधणार १० नवे फुट-ओवर ब्रिज

पुण्यासाठी मुंबई, ठाण्यातून 'या' तारखेपासून धावणार वातानुकूलित ‘शिवाई’ बस

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा