Advertisement

मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी गारेगार, लवकरच धावणार 238 एसी लोकल

राज्यात 238 एसी लोकल बांधणीला तसेच 80 किमी लांबीचे नवे लोकल मार्ग उभारणीला परवानगी मिळाली आहे.

मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी गारेगार, लवकरच धावणार 238 एसी लोकल
SHARES

मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) अखेर मुंबईसाठी 238 नवीन वातानुकूलित (AC local) उपनगरीय गाड्यांच्या खरेदीसाठी निविदा काढण्यास तयार आहे.

हा प्रकल्प मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाचा एक भाग आहे – ज्याला केंद्र आणि राज्य यांनी संयुक्तपणे निधी दिला आहे.

राज्यात 238 एसी लोकल बांधणीला तसेच 80 किमी लांबीचे नवे लोकल मार्ग उभारणीला परवानगी मिळाली आहे.  एमयूटीपी-3 अ प्रकल्पसंचासाठी तातडीने 100 कोटी रुपये मुंबई रेल्वे विकास महामंडळाला देण्यात येणार आहेत. 

80 किमी लांबीचे नवे लोकल मार्ग उभारणीला परवानगी मिळाली आहे.  एमयूटीपी-3 अ प्रकल्पसंचासाठी तातडीने 100 कोटी रुपये मुंबई रेल्वे विकास महामंडळाला देण्यात येणार आहेत. तशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

33 हजार 690 कोटींचा एमयूटीपी-3 अ प्रकल्पसंचात 10 रेल्वे प्रकल्पांचा समावेश आहे. त्याचा खर्च 33 हजार 690 कोटी रूपये एवढा आहे.

सध्या कार्यरत असलेल्या एसी गाड्या अंशतः वेस्टिब्युलर आहेत; म्हणजे ते प्रत्येकी सहा डब्यांच्या दोन भागात विभागलेले आहेत. नवीन लोकल गाड्या पूर्णपणे वेस्टिब्युलर असतील, ज्यामध्ये उपकरणे एकतर छतावर असतील किंवा खाली स्लंग असतील, पाऊस/पाण्यापासून योग्य संरक्षण असेल.

MUTP ही लोकल ट्रेनमधील गर्दी कमी करून भविष्यातील रहदारीच्या गरजांसाठी पुरेशी जागा ठेवून मुंबईची लाइफलाइन वाढवण्याची भव्य दृष्टी आहे.

मार्च 2019 मध्ये त्याला मंजुरी देण्यात आली होती. केंद्राने या प्रकल्पाला मंजुरी दिल्यावर राज्य सरकारकडून त्याला निधी मिळाला नव्हता. हा निधी मिळावा यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. येत्या काही दिवसांत हा निधी जमा होईल.



हेही वाचा

पश्चिम रेल्वेवर 5 एप्रिलपासून आणखी 11 नॉन-एसी गाड्या धावणार

नवी मुंबई मेट्रो एप्रिलमध्ये सुरू होणार, स्टेशन्स, भाडे जाणून घ्या

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा