अंधेरी स्टेशनवर थांबणार नाहीत 'या' तीन फास्ट लोकल!

Mumbai
अंधेरी स्टेशनवर थांबणार नाहीत 'या' तीन फास्ट लोकल!
अंधेरी स्टेशनवर थांबणार नाहीत 'या' तीन फास्ट लोकल!
See all
मुंबई  -  

मुंबई लोकलच्या इतिहासात पहिल्यांदाच चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या तीन फास्ट लोकल ट्रेन अंधेरी स्थानकावर थांबणार नाहीत. या तीनपैकी दोन लोकल गोरेगाव आणि एक लोकल मालाडहून चर्चगेटसाठी चालवण्यात येईल. सकाळच्या पिक आवरमध्ये या तिन्ही गाड्या अंधेरी स्थानकावर थांबणार नाहीत.या तिन्ही गाड्यांचे वेळापत्रक

  • वेळ - सकाळी 8 वाजून 6 मिनिट - चर्चगेट
  • वेळ - सकाळी 9 वाजून 5 मिनीट - गोरेगाव-चर्चगेट
  • वेळ - सकाळी 9 वाजून 59 मिनीट - गोरेगाव-चर्चगेट
  • या तीनही गाड्या जोगेश्वरी स्थानकावर थांबतील

टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वेचे व्यवस्थापक मुकुल जैन यांचे म्हणणे आहे की, या तिन्ही गाड्यांचे वेळापत्रक बुधवारपासून लागू केले जाईल.

पण गोरेगावसाठी हार्बर सेवा सुरू झाल्यानंतर या गाड्या अंधेरी स्थानकावर पुन्हा थांबतील. डिसेंबर 2017 पर्यंत हार्बर सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा - 

मुंबईला मिळणार ६० नव्या 'लोकल'


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.