Advertisement

मुंबईला मिळणार ६० नव्या 'लोकल'


मुंबईला मिळणार ६० नव्या 'लोकल'
SHARES

लोकलच्या गर्दीत प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईच्या लोकलसेवेत ६० नव्या गाड्यांचा समावेश करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा विचार असून या लोकल मुंबईत दाखल झाल्यास गर्दीचा ताण हलका होण्यास मदत होऊ शकेल.


कुठे, किती लोकल ?

एकूण ६० लोकलपैकी पश्चिम मार्गसाठी ३२ लोकल गाड्या, मध्य रेल्वेच्या मेन लाइनसाठी १४ लोकल गाड्या आणि ट्रान्स हार्बरसाठी २८ लोकल गाड्या मुंबईत दाखल होणार आहेत.


कधी मिळणार ?

रेल्वे मंत्री पियूष गोयल सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा आॅक्टोबर महिन्याच्या सुरूवातीस या ६० नवीन लोकल गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी सांगितले की वाढलेल्या लोकसंख्येनुसार उत्तरेकडून लोकल गाड्यांसाठी मागणी अधिक आहे. वांद्रे-कुर्ला काॅम्प्लेक्स, लोअर परळ, नवी मुंबई आणि अंधेरी येथे नवीन व्यावसायिक, निवासी क्षेत्र विकसित झाल्याने मुंबई लोकलचा पॅटर्न बदलला आहे. त्यामुळे दादर, कुर्ला, वडाळा अशा स्थानकांवरून नवीन लोकल ट्रेन सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील.



हेही वाचा -

मुंबईकरांनो! कशी थांबवाल लोकलमधली स्टंटबाजी?

लघुशंकेसाठी शुल्क आकारणी सुरूच, रेल्वे प्रवासी नाराज



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा