Advertisement

ठाणे-मुंब्रा बायपास रोड वाहतुकीसाठी खुला


ठाणे-मुंब्रा बायपास रोड वाहतुकीसाठी खुला
SHARES

मागील ८ मे पासून वाहतुकीसाठी बंद असलेला ठाणे-मुंब्रा बायपास रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा रस्ता धोकादायक झाला असल्यामुळे दुरुस्तीकरता बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान, आता या रास्त्याचं काम पूर्ण झालं असून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

दुरुस्तीच्या कामासाठी या मार्गावरून जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आला होता. जड वाहतूक ऐरोली आणि कल्याणमार्गे वळवण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. त्याचप्रमाणे, ठाणे आणि ऐरोली मार्गावरील टोलनाक्यावर देखील वाहतूक कोंडी होत असल्यामुळे टोल वसूली बंद करण्यात आली होती.

ठाणे-मुंब्रा बायपास रोड दुरुस्तीसाठी बंद असल्यानं या मार्गावरील संपूर्ण वाहतुकीचा ताण ऐरोली आणि शीळफाटा मार्गावर पडत होता. त्याचप्रमाणे उरणमधील जेएनपीटी बंदरातून नाशिक आणि गुजरातच्या दिशेनं जाणाऱ्या वाहतुकीसाठी मुंब्रा बायपास मार्गाचा पर्याय उपलब्ध होता. मात्र गेल्या ४ महिन्यांनपासून हा रोड वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. मात्र, सोमवारी या मार्गाच्या दुरुस्तीच काम पूर्ण झाल्यान ठाणे-मुंब्रा बायपास रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा