Advertisement

रेल्वेच्या गर्दी नियंत्रणासाठी 'कुंभ' चा अनुभव


रेल्वेच्या गर्दी नियंत्रणासाठी 'कुंभ' चा अनुभव
SHARES

मागील वर्षी एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या घटनेला तेथील अनियंत्रित गर्दी कारणीभूत होती. अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून मध्य रेल्वेकडून विशेष काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी नुकतीच मध्य रेल्वेकडून एक कार्यशाळा आयोजित केली होती. नाशिक येथील कुंभमेळ्याचा अनुभव असलेले नाशिकचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केलं.

सिंघल यांनी आपले अनुभव मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमोर मांडले. मुंबईच्या विविध स्थानकावर दिवसेंदिवस वाढणाऱ्या गर्दीवर कसं नियंत्रण मिळवावं, यासंदर्भात सिंघल यांनी रेल्वेला मार्गदर्शन केलं. गर्दीचे प्रकार आणि ती नियंत्रित करण्यासाठी अनेक सूचना त्यांनी केल्या. या कार्यशाळेला मस्जिद, परळ, चिंचपोकळी, करी रोड, दादर, कुर्ला, घाटकोपर या स्थानकावरील रेल्वे ऑपरेशन विभाग, आरपीएफ, जीआरपीएफ आणि होमगार्डचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


कोण आहेत सिंघल

रवींद्र सिंघल हे सध्या नाशिकचे पोलिस आयुक्त अाहे. मुंबईमध्ये लोहमार्ग पोलिस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. क्राऊड मॅनेजमेंट या विषयात त्यांनी पीएचडी केली आहे. कुंभमेळ्यामध्ये दोन वेळा गर्दीचं नियोजन करण्याचा त्यांना अनुभव आहे.


स्थानकावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांना विशेष रंगाचे जॅकेट देण्यात येतील. तसंच पावसादरम्यान सतत विविध प्रकाच्या सुरक्षेसंदर्भात घोषणा देण्यात येतील.
- सचिन भालोदे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा अायुक्त, मध्य रेल्वे.



हेही वाचा -

परळचा नवीन प्लॅटफॉर्म १० जूनपासून वापरात

पावसाळ्यात कोकण रेल्वेचा वेग मंदावणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा