SHARE

मध्य रेल्वेवरील परळ स्टेशनवरील नवीन प्लॅटफॉर्म १० जूनपासून प्रत्यक्ष वापरात येणार आहे. यामुळे या स्टेशनवरील गर्दी कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे. ही मार्गिका सुरू करण्यासाठी सध्याचा प्लॅटफॉर्म क्रमांक एक तात्पुरता बंद केला जाणार असून या मार्गावरील गाड्या नवीन फलाटावरून वळवण्यात येतील. त्यानंतर सहा महिन्यांनी या प्लॅटफॉर्मवर पुन्हा ही सुरू केली जाणार आहे.


ही सेवा १० जूनपासून सुरू

मागच्या वर्षी परळ-एल्फिन्स्टन पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ प्रवाशांचा बळी गेला होता. या दुर्घटनेनंतर रेल्वे यंत्रणेने प्रवासी गर्दी व्यवस्थापनासाठी वेगवेगळे उपाय हाती घेतले. त्यात रखडलेल्या परळ टर्मिनसची कामं वेगाने हाती घेण्यात आली. पण परळ टर्मिनसचं काम रखडल्याने हा मार्ग खुला झाला नव्हता. आता ते काम पूर्ण झाल्याने ही सेवा १० जूनपासून सुरू करण्यात येईल, असं मंगळवारी जाहीर करण्यात आलं.


प्रवाशांच्या सोयीसाठी

परळ स्टेशनवरील या नवीन प्लॅटफॉर्मवर सीएसएमटीच्या दिशेने कोणताही पादचारी पूल नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. यामुळे जुना आणि नवा प्लॅटफॉर्म तीन मार्गाने जोडला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे रुळ ओलांडण्यात अडचण येणार नाही.

संबंधित विषय
ताज्या बातम्या