Advertisement

अनोळखींना 'लिफ्ट' देणं 'पडलं महागात


अनोळखींना 'लिफ्ट' देणं 'पडलं महागात
SHARES

मुंबईत एकदा पाऊस सुरु झाला की तो किती वेळ आणि कसा कोसळेल याचा काही नेम नाही. पावसात अडकलेल्यानां मदत करायला मुंबईकर नेहमीच आघाडीवर असतात. कारण प्रत्येकावरच असा प्रसंग कधी ना कधी येतोच. मात्र नवी मुंबईच्या ऐरोली येथील नितीन नायर या तरुणाला पावसात अडकलेल्यानां 'लिफ्ट' देणं खूपच महागात पडलं.


पोलिसांनी लावला २ हजारांचा दंड

१८ जूनला नितीन आपल्या ऑफिसला जात होते. तेव्हा रस्त्याच्या कडेला तीन जण गाडीची वाट पाहत उभे होते. त्यावेळी जोरात पाऊस सुरु होता म्हणून नितीनने त्यांना आपल्या गाडीत बसवलं. त्यामध्ये एक वृद्ध (६०) आणि दोन ऑफिसला जाणारे तरूण होते.


<iframe src="https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fcoolnitin02jan%2Fposts%2F10215426934403256&width=500" width="500" height="676" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allow="encrypted-media"></iframe>


नियम काय सांगतो?

त्याच मार्गावर असलेल्या गांधी नगर ला त्यांना जायचं होते. मात्र काही अंतर गेल्यावर वाहतूक पोलिसांनी त्यांची गाडी अडवून त्यांना २००० रुपयांचा दंड लावला आणि त्यांचं लायसन्स सुद्धा जप्त केलं. सोबत अनोळखी व्यक्तींना लिफ्ट देणं गुन्हा असल्याचं सांगत त्यांना गाडीखाली उतरायला लावलं.

नितीनने आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या घटनेची माहिती देत आपल्याच शहरातील इतरांना मदत करणं चुकीचं आहे का? असा सवाल केला आहे.



हेही वाचा-

एक्स्प्रेसवरील टोल जाणार की राहणार? 9 आठवड्यात ठरणार

आणि पहिली शिवशाही मुंबईहून निघाली बंगळुरूला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा