Advertisement

लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात नवा पादचारी पूल


लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात नवा पादचारी पूल
SHARES

मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकात नवीन पादचारी पुल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या कामाला सुरूवात देखील झाली आहे. या पुलाच्या निविदा प्रक्रियेला २४ तासांच्या आत मंजुरी देण्यात आल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे.


निविदेला तत्काळ मंजुरी

मंगळवारी दुपारी १२ वाजता या पुलासाठीची निविदा तयार करण्यात आली आणि त्याच दिवशी पुलाचे काम संबंधित ठेकेदाराला सोपवण्यात आले. ठेकेदारानेही हे काम घेतल्याचे पत्र मध्य रेल्वेला परत केले.


लोकमान्‍य टिळक टर्मिनस येथील नवीन स्‍थानक इमारतीजवळ मुंबई दिशेकडे हा पादचारी पुल बांधण्‍यात येणार आहे. पाचही फलाटांना जोडणाऱ्या या पादचारी पुलाचा मार्ग असणार आहे. शिवाय, हा पूल 6 मीटर रूंद असून प्रत्‍येकी 18 मीटर लांबीचे स्‍पॅन या पुलाला असणार आहेत. या पुलाचा उतार फलाटाच्या एका दिशेला तर दुसऱ्या दिशेला 2.50 मीटर रूंदीचे जिने बनवण्‍यात येणार आहेत.

सुनील उदासी, मुख्‍य जनसंपर्क अधिकारी, मध्‍य रेल्‍वे


पुलाला एवढा येणार खर्च

या पादचारी पुलाचा अंदाजे खर्च 2.97 करोड एवढा आहे. या पादचारी पुलाच्या बांधकामाची सुरुवात गुरुवारी झाली असून 6 महिन्‍यांत हा पुल पूर्ण होण्‍याची शक्‍यता असल्याचंही मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.हेही वाचा

पश्चिम रेल्वे स्थानकांवर नवे १२ पादचारी पूल, १७ पुलांची पुनर्बांधणी


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement