Advertisement

पश्चिम रेल्वे स्थानकांवर नवे १२ पादचारी पूल, १७ पुलांची पुनर्बांधणी


पश्चिम रेल्वे स्थानकांवर नवे १२ पादचारी पूल, १७ पुलांची पुनर्बांधणी
SHARES

एल्फिन्स्टन पूल चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर मुंबईतील प्रत्येक स्थानकांवरील पादचारी पुलांचं ऑडिट करण्यात आलं. या ऑडिटसाठी नेमलेल्या मल्टी डिसीप्लिनरी टीमने तयार केलेला आॅडिट रिपोर्ट पश्चिम रेल्वेने बुधवारी सादर केला. या रिपोर्टनुसार, पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवर एकूण १२ नवे पादचारी पूल बांधण्यात येणार असून १७ पुलांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. त्यापैकी महापालिकेच्या मदतीतून ७, तर रेल्वेच्या पैशाने २९ अशा एकूण ३६ पुलांच्या निविदा प्रक्रियेला नोव्हेंबरपासून सुरूवात होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

या २९ पादचारी पुलांपैकी २४ पादचारी पुलांना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मान्यता दिली आहे. तर, उर्वरीत ५ ठिकाणच्या पादचारी पुलांची पुनर्बांधणी करण्याची गरज असल्याचं मल्टी डिसीप्लिनरी टीमने केलेल्या ऑडिटमधून समोर आलं आहे.


किती खर्च?

या अहवालानुसार, मरीन लाईन्स, एल्फिन्स्टन रोड, वांद्रे, अंधेरी, भाईंदर या स्थानकावरील पादचारी पुलांची पुनर्बांधणी करण्यात येईल तसेच नवीन पूल बांधण्यात येतील. या सर्व पुलांच्या बांधणीसाठी एकूण २४५ कोटी रुपये एवढा खर्च येईल.

या सर्व सर्वेक्षणासाठी ५ टीम नेमण्यात आल्या होत्या. रेल्वे विभाग, जीआरपी, आरपीएफ, महापालिका यांचा त्यात समावेश होता. या टीमने मिळून एकूण ३६ स्थानकांचं सर्वेक्षण केलं. त्यानंतर हा रिपोर्ट बनवण्यात आला.


रिपोर्टमधील महत्त्वाचे मुद्दे  

पश्चिम उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील अपूर्ण आणि तुटलेल्या अवस्थेतील छप्परांच्या दुरुस्ती आणि  नूतनीकरणासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसंच पश्चिम रेल्वेच्या दुहेरी बाजूने वाहतूक चालणाऱ्या प्लॅटफाॅर्मवरील उपहारगृह आणि स्वच्छतागृहे स्थानक परिसरातील अन्य सार्वजनिक ठिकाणी स्थलांतरित करण्याची सूचना ऑडिट समितीने केली आहे. समितीने अहवालात प्लॅटफाॅर्म परिसर मोकळा करण्यावर भर दिला आहे.

लोकल सेवेत प्रथम श्रेणीच्या डब्यात १५ किलो आणि द्वितीय श्रेणीच्या डब्यामध्ये १० किलो इतकेच सामान नेण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव समितीने मांडला आहे. 


सुरक्षेसाठी बटालियन फौज

सुरक्षेसाठी ९७ नवीन होमगार्डची भरती करण्यात येणार असून रेल्वे प्रशासनाच्या मदतीसाठी २०० मदतनीसांची बटालियन फौज उभारण्यात येणार आहे. हे सर्व मदतीनस गर्दीच्या स्थानकांवर आणि स्थानकांबाहेरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतील. तसंच मुंबईत येणाऱ्या नवीन प्रवाशांच्या माहितीसाठी स्थानकाबाहेर आणि आत सूचना फलक लावण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील जे पूल वापरात नाही ते बॅरिकेट्स लावून बंद करण्यात येतील.


अत्याधुनिक सीसीटीव्ही

पुढच्या १५ महिन्यांत सर्व स्टेशन्स आणि ट्रेनमध्ये एकूण १६०० अत्याधुनिक सीसीटिव्ही बसवण्यात येणार आहेत. यासाठी १० कोटी रुपये खर्च येणार आहे. या सीसीटीव्हीद्वारे आपत्कालीन परिस्थितीत अलार्म वाजेल आणि रेल्वे पोलिसपासून सर्वांनाच अलर्ट मिळेल. शिवाय, याच काळात 'टॉकबॅक सिस्टम'ही महिलांच्या डब्ब्यात बसवण्यात येणार आहे.


एल्फिन्स्टन रोडवर स्कायवॉक

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील अपघातग्रस्त अरूंद पादचारी पुलाच्या जागी नवा १२ मीटर पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. त्याच्या उत्तर टोकाला पश्चिम दिशेला स्कायवॉक उभारण्यात येणार असून त्याला महापालिकेच्या जागेत पोहच रस्ता देण्यात येणार आहे.


घुसखोरी रोखण्याचं आव्हान

पश्चिम रेल्वेवर १७.५ किलोमीटरचा पट्टा तटबंदी शिवाय असून तेथे अनधिकृतरित्या रूळांवर घुसखोरी केली जात आहे. एमयुटीपी-३ अंतर्गत ट्रॅक पासिंग कंट्रोल प्रकल्पात याचा समावेश करण्याची मागणी पश्चिम रेल्वेने केली आहे. पश्चिम रेल्वेने तटबंदीची भगदाडे बुजविण्यासाठी ४.३० कोटी रूपये मंजूर केले आहेत.


संयुक्त समितीच्या सूचना

पश्चिम रेल्वेच्या संयुक्त समितीने शिफारस केल्यानुसार मरीन लाईन्स उत्तर, एल्फिन्स्टन रोड स्कायवॉक, वांद्रे दक्षिण, अंधेरी, भाईंदर दक्षिण आदी ५ ठिकाणी कामकाज होणार आहे.


महापालिकेच्या सहकार्याने कामे

महापालिकेच्या मदतीने माटुंगा रोड, माहीम, खार रोड, विलेपार्ले, विरार, वांद्रे ते वांद्रे टर्मिनस स्कायवॉक, वांद्रे या ठिकाणी ७ पादचारी पुलांची कामे होणार आहेत.

पुलांची पुनर्बांधणी (दिशा)
 नवे पादचारी पूल
मरीन लाईन्स (मध्य)
ग्रँट रोड
चर्नीरोड (उत्तर)
महालक्ष्मी
ग्रँट रोड (दक्षिण)
माहीम
मुंबई सेंट्रल (दक्षिण)
विलेपार्ले
मुंबई सेंट्रल (उत्तर)
जोगेश्वरी
लोअर परळ (उत्तर)
बोरीवली (दक्षिण) रूंदीकरण
वांद्रे (मध्य )
बोरीवली मध्य वाढविणार
सांताक्रूझ (दक्षिण)
दहिसर
अंधेरी (मध्य)
वसई
गोरेगाव (मध्य)
विरार
मालाड (दक्षिण)

नायगाव (दक्षिण)

वसई (मध्य)

नालासोपारा (उत्तर)

                                    
   


हेही वाचा -             

मध्य रेल्वेवर १२ नवे पादचारी पूल

दादर स्टेशनचा 'हा' जिना तोडल्यामुळे प्रवासी त्रस्त


                                             
                                             
                                               
                                 
                                             
                                               
                                                       
                                                   




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा