मुंबई - 5 नोव्हेंबरपासून एअर इंडियाचा स्टाफ तुमचं स्वागत न्यू लुकमध्ये करणाराय. एअर इंडियानं त्यांच्या स्टाफच्या युनिफॉर्ममध्ये बदल केलाय. त्यानुसार एअर इंडियाचा पूर्ण स्टाफ न्यू युनिफॉर्ममध्ये दिसेल. दोन वर्षानंतर एअर इंडियाच्या युनिफॉर्म आणि लुकमध्ये बदल करण्यात आलाय. निफ्टनं तयार केलेल्या जून्या युनिफॉर्मसाठी एअर इंडियानं आठ कोटींचा खर्च केला होता. एअर इंडियाचा जूना युनिफॉर्म आणि जेट एअरवेजच्या युनिफॉर्ममध्ये साम्य होतं. त्यामुळे एअर इंडियानं न्यू युनिफॉर्म बनवण्याचा निर्णय घेतला.